आपचे 20 आमदार निलंबित; राष्ट्रपतींकडूनही मंजूरी

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आपच्या 21 आमदारांना संसदीय सचिव बनवण्यात आलं होतं. पण हे पदं लाभाचं पद आहे. त्यामुळे निवडणुक आयोगानं त्यांचं पद काढून घेण्यासाठी शिफारस केली होती.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2018 04:34 PM IST

आपचे 20 आमदार निलंबित; राष्ट्रपतींकडूनही मंजूरी

21 जानेवारी : लाभाचं पद दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयामुळं दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आपच्या 21 आमदारांना संसदीय सचिव बनवण्यात आलं होतं. पण हे पदं लाभाचं पद आहे. त्यामुळे निवडणुक आयोगानं त्यांचं पद काढून घेण्यासाठी शिफारस केली होती. या 21 आमदारांपैकी 1 आमदारानं आधीच राजीनामा दिला होता. पण बाकीचे 20 आमदार पदावर कार्यरत होते. या संबंधी पार्टीनं दिल्ली हायकोर्टचा दरवाजा ठोठावला होता. पण तिथेही त्यांना थारा मिळाला नाही. आणि अखेर निवडणूक आयोगाच्या शिफारसीला मंजूरी देत राष्ट्रपतींकडून या 20 आमदारांचं निलंबन करण्यात आलं.

या 20 आमदारांचं सदस्यत्व केलं रद्द

1. प्रवीण कुमार, जंगपुरा

2. शरद कुमार चौहान, नरेला

Loading...

3. आदर्श शास्त्री, द्वारका

4. मदन लाल, कस्तूरबा नगर

5. शिव चरण गोयल, मोती नगर

6. सरिता सिंग, रोहतास नगर

7. नरेश यादव, महरौली

8. जरनॅल सिंह, तिलक नगर

9. राजेश गुप्ता, वजीरपुर

10. अलका लांबा, चांदनी चौक

11. नितिन त्यागी, लक्ष्मी नगर

12. संजीव झा, बुराडी

13. कैलाश गहलोत, नजफगढ

14. विजेंद्र गर्ग, राजिंदर नगर

15. राजेश ऋषि, जनकपुरी

16. अनिल कुमार वाजपेयी, गांधीनगर

17. सोमदत्त, सदर बाजार

18. सुखबीर सिंग दलाल, मुंडका

19. मनोज कुमार, कोंडली

20. अवतार सिंह, कालकाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2018 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...