'काँग्रेस अहंकारी; दिल्लीत डिपॉजिट देखील जप्त होणार'

काँग्रेसशी आघाडीचा निर्णय फिसकटल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 01:38 PM IST

'काँग्रेस अहंकारी; दिल्लीत डिपॉजिट देखील जप्त होणार'

नवी दिल्ली, 10 मार्च : भाजपविरोधात देशात महाआघाडी करून काँग्रेसनं देशातील भाजपविरोधी पक्षांची मोट बांधली. पण, दिल्लीत मात्र 'आप'सोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी नकार दिला. त्यामुळे काँग्रेस - आप आघाडी होऊ शकली नाही. 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र आता थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. 'काँग्रेस अहंकारी आहे, त्यांचं दिल्लीत डिपॉझिट देखील जप्त होईल' अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शिला दिक्षित यांनी 'आप'शी आघाडी करण्यासाठी नकार दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे 'आप'सोबत आघाडी करण्यासाठी अनुकूल होते. पण, दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी मात्र त्याला नकार दिला. 5 मार्च रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. 'आप'सोबत आघाडीची करण्याच्या शक्यता पडताळून पाहावी, असा या बैठकीचा उद्देश होता. पण, नेत्यांनी मात्र दिल्लीत काँग्रेसची ताकद असून 'आप'शी आघाडी करण्यास नकार दिला. काँग्रेस नेत्या शिला दिक्षित यांनी त्याबाबतची घोषणा केली.


लोकसभेसह या 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही आज होणार घोषणा?


Loading...

केजरीवालांची होती तयारी

दरम्यान, काँग्रेसशी हात मिळवणी करण्यासाठी 'आप'नं तयारी देखील केली होती. याबाबत बोलताना आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती झाली तर दिल्लीमध्ये भाजपचा सपशेल पराभव होईल. पण, काँग्रेस यासाठी का तयार नाही हे कळत नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि तेलुगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू हे दिल्ली काँग्रेस - आप एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करत होते. चंद्राबाबू नायडू यांनी याबद्दल काँग्रेस नेतृत्वाशी चर्चाही केली होती. पण, त्याला यश आलं नाही.


7 जागांवर आप उमेदवार

दरम्यान, दिल्लीतील 7 जागांवर 'आप'नं उमेदवार जाहीर केले असून किमान 3 जागा जिंकण्याचा विश्वास आम आदमी पक्षाला आहे.


VIDEO: 'देशाच्या सुरक्षेमध्ये CISFची भूमिका महत्त्वाची'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 01:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...