गुजरातमध्ये 'आप'चा सुपडा साफ; डिपॉझिटही जप्त होण्याची शक्यता

गुजरातमध्ये 'आप'चा सुपडा साफ; डिपॉझिटही जप्त होण्याची शक्यता

पंजाब आणि गोव्यानंतर आता आपने गुजरातमध्येही 20 उमेदवार उतरवले आहेत. या 20 उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी डोर टू डोर प्रचारही केला.पण आपच्या उमेदवारांना काही विशेष पाठिंबा मिळालेला नाही

  • Share this:

18 डिसेंबर: गुजरातमध्ये  भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. पण दिल्लीमध्ये सत्ता  काबीज करणाऱ्या 'आप'ला मात्र इथे खातंही उघडता आलेलं नाही. इतकंच   काय  त्यांचं डिपॉझिटही जप्त होण्याची शक्यता आहे.

पंजाब आणि गोव्यानंतर  आता आपने गुजरातमध्येही 20 उमेदवार उतरवले आहेत. या 20 उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी डोर टू डोर प्रचारही केला.पण आपच्या उमेदवारांना काही विशेष पाठिंबा मिळालेला नाही. कुठल्याच मतदारसंघात आपचे उमेदवार टॉप 10 उमेदवारांमध्येही नाहीत. तर काही ठिकाणी आपच्या उमेदवारांहून जास्त मतं ही अपक्ष उमेदवारांना मिळाली आहेत. तसंच एका ठिकाणी मायावतीच्या बीएसपीनेही आपला मागे टाकलं आहे.

गुजरातची रणनीती लक्षात घेऊन या राज्याची जबाबदारी अरविंद केजरीवालांनी  गोपाल राय यांच्यावर सोपवली होती. माध्यमांमध्येही आपची जास्त कुठे चर्चा नव्हती. एकंदरच आता दिल्लीनंतर तिन्ही राज्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर आपची पुढची रणनीती काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading