वडिलांनी 6 कोटी देऊन मिळवलं लोकसभेचं तिकीट; उमेदवाराच्या मुलानेच केला खळबळजनक आरोप

वडिलांनी 6 कोटी देऊन मिळवलं लोकसभेचं तिकीट; उमेदवाराच्या मुलानेच केला खळबळजनक आरोप

माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे न देता स्वतःला निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून दिले. त्यांनी लोकसभेची उमेदवारी 6 कोटींना विकत घेतली, असा आरोप दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारानेच केला आहे.

  • Share this:

दिल्ली, 11 मे : माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी पैसे न देता स्वतःला निवडणुकीचं तिकीट मिळावं म्हणून दिले. त्यांनी लोकसभेची उमेदवारी 6 कोटींना विकत घेतली, असा आरोप दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारानेच केला आहे. आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीचे उमेदवार बलवीर जाखड यांचा मुलगा उदय जाखड यांनी पक्षाविरोधात खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

तिकीट मिळावं यासाठी माझ्या वडिलांकडून आम आदमी पक्षाने 6 कोटी रुपये घेतले. माझ्या शिक्षणासाठी पैसे द्यायला वडिलांनी नकार दिला आणि त्या बदल्यात 6 कोटी रुपये केजरीवालांना देऊन तिकीट विकत घेतलं, असं उदय जाखड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आपल्या पित्याविरोधातच प्रचार करणाऱ्या उदय यांनी जी व्यक्ती आपल्या घरातल्या समस्या दूर करू शकत नाही अशा व्यक्तीला मत देताना विचार करा, असंही सांगितलं.

बलवीर जाखड यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. त्यांनी फक्त तीन महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आणि पैशाच्या जोरावर थेट लोकसभेचं तिकीट मिळवलं. अशा व्यक्तीला मत देताना दिल्लीकरांनी दहावेळा विचार करावा, असं उदय म्हणाले.

First published: May 11, 2019, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading