मोदी लाटेमुळे नाही तर ईव्हीएम लाटेमुळे पराभव, 'आप'चा आरोप

मोदी लाटेमुळे नाही तर ईव्हीएम लाटेमुळे पराभव, 'आप'चा आरोप

देशात लोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर ईव्हीएम मशिन्सद्वारे भवितव्य ठरवले जात आहे. मात्र, यापासून लोकशाहीसाठी हा फार मोठा धोका असल्याचा इशाराही राय यांनी दिला आहे.

  • Share this:

26 एप्रिल :  दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोदी लाटेमुळे नव्हे तर ईव्हीएम लाटेमुळे विजय मिळाल्याचा आरोप आपचे मंत्री गोपाळ राय यांनी केला.

दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यापासूनच उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या तिन्ही महानगरपालिकेत भाजपने मोठी आघाडी घेतली. या तिन्ही महानगरपालिकांच्या एकूण 270 जागांपैकी  182 जागांवर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर काँग्रेस आणि आप यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे. काँग्रेस 35, आप 45 आणि इतर पक्ष 10 जागांवर आघाडीवर आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून या पालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे. याठिकाणी जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. मात्र, तरीदेखील जनता भाजपलाच निवडून देत आहे, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे, असं सांगत गोपाळ राय यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंत. देशात लोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर ईव्हीएम मशिन्सद्वारे भवितव्य ठरवले जात आहे. मात्र, यापासून लोकशाहीसाठी हा फार मोठा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

First published: April 26, 2017, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading