मुंबई, 02 आॅगस्ट : पाकिस्तानचं पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला आमिर खान जाणार नाही. न्यूज18लोकमतशी बोलताना आमिर खाननं हे सांगितलं. आपल्याला आमंत्रण मिळालं नाही असंही आमिरनं यावेळी सांगितलं. इम्रान खानच्या शपथविधीसाठी सुनील गावसकर, कपिल देव यांनाही आमिर खान यांना आमंत्रण होतं.
क्रिकेटर ते पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या इम्रान खान यांचा शपथविधी सोहळा जंगी होणार आहे. 11 आॅगस्टला या शपथविधीसाठी भारतातून अभिनेता आमिर खान आणि माजी क्रिकेटर कपील देव, सुनील गावस्कर यांना आमंत्रण पाठवण्यात आलंय.
पाकिस्तान सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफने जोरदार मुसंडी मारली. आता 11 आॅगस्टला पंतप्रधान म्हणून इम्रान खान शपथ घेणार आहे. या शपथविधीला देशभरातील मान्यवर आणि सेलिब्रिटी उपस्थितीत राहणार आहे.
पीटीआयचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी पाकिस्तान कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, माजी क्रिकेटर सुनील गावस्कर, कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण पाठवलंय. तसंच अभिनेता आमिर खानलाही आमंत्रित करण्यात आलंय.
पाकिस्तान सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पीटीआईने 116 जागा जिंकल्यात. पीटीआई सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी 22 जागांची गरज आहे. मात्र, इम्रान यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असून पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीटीआईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीसाठी बोलवण्यासाठी हालचाल सुरू केलीये. सार्क देशातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलावण्याचा पीटीआईचा विचार आहे. पण अजून कुणालाही निमंत्रण पाठवण्यात आले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Imran khan, India, Outh, Pakistan, आमिर खान, पाकिस्तान, भारत