लोकसभा 2019: शरद पवार झाले 'आप'ला माणूस, दिल्लीतलं राजकारण बदलणार?

लोकसभा 2019: शरद पवार झाले 'आप'ला माणूस, दिल्लीतलं राजकारण बदलणार?

दिल्ली राज्यातील सत्तधारी आम आदमी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्फत काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च: लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 9 दिवस झाल्यानंतर देखील देशात आघाडी आणि युतीच्या चर्चा सुरुच आहेत. दिल्ली राज्यातील सत्तधारी आम आदमी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्फत काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. 'आप'ने दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यातील लोकसभेसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शरद पवार यांच्या मार्फत पाठवलेल्या प्रस्तावात 'आप'ने आघाडीसाठीचा एक फॉर्मूला देखील पाठवला आहे. राजधानी दिल्लीत लोकसभेच्या 7 जागा आहेत. यातील 2 जागा काँग्रेसला देण्याची तयारी 'आप'ने केली आहे. पंजाबमधील 13 पैकी 10 जागा काँग्रेसला तर 3 जागा 'आप'साठी सोडाव्यात. हरियाणातील 12 पैकी दोन जागा 'आप'साठी व जेजेपी आणि काँग्रेसला प्रत्येकी 4 जागा द्याव्यात, असे प्रस्तावात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत 'आप' सोबत जायचे की नाही यावरुन काँग्रेसमध्येच मतभेद आहेत. दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पी.सी. चाको यांच्या मते पक्षातील अधिकतर नेते आपसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या बाजूने आहेत. 'आप' सोबत आघाडी केल्यास भाजपचा पराभव करण्यास मदत होईल.

अर्थात 'आप'सोबत जायचे की नाही यासंदर्भातील अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच घेतली असे चाको यांनी सांगितले. काँग्रेसच्या काही नेत्यांचा याला विरोध असला तरी भाजपचा पराभव करण्यासाठी 'आप' सोबत जाण्याचा निर्णय अन्य नेते मान्य करतील असेही ते म्हणाले.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. दिल्लीत भाजप आणि 'आप' यांच्याविरुद्ध निवडणूक लढणे शक्य होणार नाही. काँग्रेस व 'आप' वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.


SPECIAL REPORT : काँग्रेस पळवणार भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जावयाला?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या