आखाडा परिषदेनं जाहीर केली बोगस बाबांची यादी

आखाडा परिषदेनं जाहीर केली बोगस बाबांची यादी

राम रहिम, राधे माँ, आसाराम यांच्यामुळे देशातल्या अध्यात्मिक गुरूंची प्रतिमा मलिन होऊ लागलीये. त्यामुळेच आता अखिल भारतीय आखाडा परिषदेनं देशातल्या भोंदूबाबांची यादीच जाहीर करून टाकलीये.

  • Share this:

10 सप्टेंबर : स्वयंघोषित बाबांनी समाजातलं वातावरण दूषित करून टाकलंय. त्यामुळे अखिल भारतीय अाखाडा परिषदेनं बोगस बाबांची यादीच जाहीर करून टाकलीये.

राम रहिम, राधे माँ, आसाराम यांच्यामुळे देशातल्या अध्यात्मिक गुरूंची प्रतिमा मलिन होऊ लागलीये. त्यामुळेच आता अखिल भारतीय आखाडा परिषदेनं देशातल्या भोंदूबाबांची यादीच जाहीर करून टाकलीये.

या यादीत गुरमीत राम रहीम, आसाराम बापू, राधे माँ, सचिदानंद गिरी, ओम बाबा, इच्छाधारी भीमानंद, स्वामी असिमानंद, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी अशा भोंदू बाबांचा समावेश आहे.

आखाडा परिषदेनं अध्यात्मिक गुरूंसाठी आचारसंहिताही तयार केली असली तरी गेल्या काही दिवसांतले बाबांचे अनेक कारनामे समोर आलेत. जेलमध्ये असलेल्या राम रहीम आणि हनीप्रीत इन्सान यांच्या मुंबईतल्या एका छुप्या ठिकाणाचा शोध पोलिसांनी लावलाय. वांद्र्यातल्या या महालवजा अलिशान फ्लॅटमध्ये दोघं ऐय्याशी करीत असल्याचं सांगण्यात येतंय.

या बोगस बाबांच्या लीला समोर येतील तोपर्यंत इतरांवरही बदनामीचे शिंतोडे उडत राहणार आहेत.

First published: September 10, 2017, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading