नवी दिल्ली, 14 जानेवारी : भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी म्हटलं आहे की, 'गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.'
#ShivajiMaharaj was a great ruler and a legendary King who worked tirelessly for the welfare of the people. He is an inspiration even today after centuries. We regard him as incomparable with others.@BJP4India
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजपला घेरलं होतं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालंय. संभाजी ब्रिगेडने तर भाजपला धमकीच दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचं भाजपचे दिल्ली प्रभारी श्याम जाजू यांनी सांगितलं. प्रकाशकांना हे पुस्तक मागे घेण्यास सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली होती.
नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा @BJP4India शी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.#ShivajiMaharaj@BJP4Maharashtra
आज के शिवाजी - नरेंद्र मोदी हे पुस्तक दिल्लीतील भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात करणय्ात आलं. यावेली भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी यासह प्रमुक नेते उपस्थित होते. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना त्यामध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्याचा प्रयत्न केल्याने पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.