Home /News /national /

Ayodhya : जिथं खोटं बोलल्यावर होतो त्रास! अयोध्यातील 'त्या' मंदिरात आदित्य ठाकरेंनी जोडले हात

Ayodhya : जिथं खोटं बोलल्यावर होतो त्रास! अयोध्यातील 'त्या' मंदिरात आदित्य ठाकरेंनी जोडले हात

अयोध्येतील (Ayodhya) लक्ष्मण किला हे असे मंदिर आहे, जिथे खोटी शपथ घेतली तर खोटे फार काळ टिकत नाही. असे मानले जाते की या मंदिरात अशा दैवी शक्ती आहेत, ज्यामुळे खोटे बोलणाऱ्यांना एकप्रकारे त्रास होतो.

  अयोध्या, 15 जून : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका प्रसिद्ध मंदिराला भेट दिली आहे. श्री लक्ष्मण किला, असं या मंदिराचं नाव आहे. श्री लक्ष्मण किला (Shri Lakshman Kila) हे अयोध्येतील असे मंदिर आहे, जिथे खोटी शपथ घेतली तर खोटे फार काळ टिकत नाही. असे मानले जाते की या मंदिरात अशा दैवी शक्ती आहेत, ज्यामुळे खोटे बोलणाऱ्यांना एकप्रकारे त्रास होतो. आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी इथं काय साकडं घातलं हे देवालाच ठाऊक. पण, या निमित्ताने लक्ष्मण किला मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊया. 'झी न्यूज'ने याबद्दल माहिती दिली आहे. लक्ष्मण किलाची अनोखी ओळख भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येतील सरयू नदीच्या (Saryu River) काठावर हे लक्ष्मण किला मंदिर आहे. श्रीरामाचा भाऊ आणि प्रत्येक सुख-दु:खात सावलीप्रमाणे साथ देणारा लक्ष्मण होते. लक्ष्मण किलावर (Lakshman kila Temple) दैवी चमत्कार दिसतात असे मानले जाते. येथे भगवान श्री रामाचा भाऊ लक्ष्मणाच्या मंदिरात भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता विराजमान आहेत. प्रभू रामाचे लाडके अनुज लखनलाल यांच्या मंदिरात खोटी शपथ घेतली जात नाही, असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीने वाद सोडवताना खोटी शपथ घेतली तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतात. इकडे लक्ष्मण पुन्हा शेषावतारात परतले लक्ष्मण किला मंदिराविषयी असे लिहिले आहे की श्री राम लंका जिंकल्यानंतर 10000 वर्षे राज्य करून आपली लीला पूर्ण करण्यासाठी जेव्हा ते परत आले तेव्हा एके दिवशी भगवान श्री राम आपल्या राजवाड्यात काळाशी बोलत होते. काळ आणि प्रभू राम यांच्या चर्चेदरम्यान अयोध्येतील त्या खोलीत कोणीही येणार नाही, जर तो आला तर दारात थांबलेल्याला मृत्यूदंड दिला जाईल, अशी अट होती. भगवान श्रीरामांनी लखनलाल यांना दारात उभे केले आणि सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नका. परंतु, दुर्वासा ऋषी (Maharshi Durvaasa) जेव्हा रामाला भेटायला आले तेव्हा लक्ष्मणाने त्यांना थांबवले, यावर रागाने दुर्वासा ऋषींनी अयोध्या नगरीलाच शाप देऊ लागले. अयोध्येला दुर्वास ऋषींच्या शापापासून वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्या खोलीत प्रवेश केला तेव्हा काळ तिथून गायब झाला. श्रीरामांनी दिलेल्या वचनानुसार लक्ष्मणजींनी भगवान राम यज्ञ करण्यासाठी निघण्यापूर्वी सरयूमध्ये शरीराचा त्याग केला. लक्ष्मण किला हे तेच ठिकाण आहे जिथे सहस्त्रधारा सरयूजी मध्ये वाहते आणि इथेच लक्ष्मणजींनी शरीराचा त्याग करुन दुसरा अवतार घेतला होता.

  मोठी बातमी! अयोध्येत महाराष्ट्रातील भाविकांसाठी 100 खोल्यांचं महाराष्ट्र सदन बांधणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

  लोक वाद मिटवायला येतात हे ठिकाण परिपूर्ण मानले जाते. आपापसातील वाद मिटवण्यासाठी लोक येथे येतात. येथे खरे व्रत घेतले जाते असे मानले जाते. कोणत्याही वादात कोणी खोटी शपथ घेतली तर त्याचे खोटे फार काळ टिकत नाही आणि सत्य समोर येते. तसेच त्याला शिक्षाही होते. त्यामुळे लक्ष्मण किल्यात कोणीही खोटे बोलत नाही. भगवान रामाला दाखवला आरसा लक्ष्मण किला इंग्रजांनी स्वामी युगलानंद शरण महाराज यांना दिला होता. ज्यावर रीवाच्या दिवाणाने (Devan Od Reeva) भव्य मंदिर बांधले. एक विशेष म्हणजे भगवान श्रीरामाचे बालस्वरूपही येथे विराजमान आहे. येथे श्रृंगार केल्यानंतर रामाला आरसा दाखवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जेव्हा पुरुष श्रृंगार करतो तेव्हा तो आरशात पाहून आनंदी असतो. अशाच प्रकारे जेव्हा भगवान रामालाही श्रृंगार केला जातो तेव्हा त्यांना आरसा दाखवून भाव व्यक्त केला जातो की, प्रभु तुम्ही खूप सुंदर दिसत आहात आणि देव प्रसन्न होतात. सर्पदंशापासून मिळते मुक्ती लक्ष्मण किलाची आणखी एक समजूत अशी की ज्याला सर्पदंशाची भीती वाटते तो लक्ष्मण गडाच्या मंदिरात जातो. त्यामुळे सर्पदंशाच्या भीतीपासून त्याची सुटका होते. लक्ष्मण गडाच्या मंदिरात माता सीतेला बहीण आणि भगवान श्री राम यांना भावजय म्हणून ओळखले जाते. यामुळेच भगवान रामाला भावाच्या रूपातही आरसा दाखवला आहे. देवाच्या सेवेची जी काही परंपरा आहे, ती गाण्यातून आहे. ज्याप्रमाणे सकाळी भगवान स्नान करताना गाणे गायले जाते, तसेच हे गाणे श्रृंगाराच्या वेळी गायले जाते.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Ayodhya

  पुढील बातम्या