आता ड्रायव्हिंग लायसन्सही आधारशी लिंक करणं सक्तीचं !

आता ड्रायव्हिंग लायसन्सही आधारशी लिंक करणं सक्तीचं !

बँक खातं, मोबाईल क्रमांक, पॅनकार्डनंतर आता ड्रायव्हिंग लायसन्सलाही आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीच ही माहिती दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : बँक खातं, मोबाईल क्रमांक, पॅनकार्डनंतर आता ड्रायव्हिंग लायसन्सलाही आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीच ही माहिती दिलीय. डिजिटल हरियाणा समीट 2017 मध्ये बोलताना त्यांनी यासंबंधीचे सुतोवाच केले. त्यामुळे लवकरच आता वाहनचालकांनाही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करावं लागणार आहे.

''आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आधारसोबत लिंक करण्यावर विचार करत असून त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या विषयावर चर्चा देखील झालेली आहे, '' असंही मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. बोसग ड्रायव्हिंग लायसन्सना प्रतिबंध घालण्यासाठी या आधार लिंकचा नक्कीच फायदा होऊ शकेल, असा दावा सरकारतर्फे केला जातोय.

आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने पॅनकार्ड यापूर्वी आधारशी लिंक करणं सक्तीचं केलंय. त्यानंतर मोबाईल नंबर आणि आता ड्रायव्हिंग लायसन्सही आधारशी लिंक करावं लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्सला आधार लिंक केल्याने वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांनाही शिक्षा करणं सोपं होईल, असं सरकारला वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 10:11 PM IST

ताज्या बातम्या