आता मृत्यू दाखल्यासाठीही आधारकार्ड बंधनकारक !

आता मृत्यू दाखल्यासाठीही आधारकार्ड बंधनकारक !

केंद्र सरकारने आता चक्क मृत्यूच्या दाखल्यासाठीही आधारकार्ड बंधनकारक केलंय. देशभरात एक ऑक्टोबरपासून मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) 5 ऑगस्ट : युपीएच्या कार्यकाळात आधार कार्डच्या सक्तीला विरोध दर्शवणाऱ्या भाजप सरकारने आता चक्क मृत्यूच्या दाखल्यासाठीही आधारकार्ड बंधनकारक केलंय. देशभरात एक ऑक्टोबरपासून मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवणं अनिवार्य करण्यात येणार आहे. ओळखीचे बनावट पुरावे तयार होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि मेघालय वगळता इतर सर्व राज्यांतील रहिवाशांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. वरील तीन राज्यांत मृत्यूच्या दाखल्यांसाठी आधार बंधनकारक होण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आधार नंबरचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक ऑक्टोबरपासून मृत्यूच्या दाखल्यासाठी आधार सक्तीचे करण्यात येणार आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

दरम्यान, सोशल मीडीयावरून मात्र, केंद्र सरकारच्या मृत्यूदाखल्यासाठी आधारसक्तीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त होतेय. मृत्यूनंतरही सरकार लोकांना छळणार का, अशा आशयाच्या नकारात्मक प्रतिक्रिया समाजमाध्यमातून लोक व्यक्त करताहेत.

First published: August 5, 2017, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading