Aadhaar Card सरकारनं घेतला मोठा निर्णय, बॅंक आणि दोन पत्त्यासंदर्भात झाले बदल

Aadhaar Card सरकारनं घेतला मोठा निर्णय, बॅंक आणि दोन पत्त्यासंदर्भात झाले बदल

भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड (Aadhaar) हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड (Aadhaar) हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे आधार कार्डाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असतं. त्यामुळं सरकारच्या वतीनं आधारवर असलेल्या माहितीत बदल करण्यासाठी एक सोपी सुविधा आणली आहे. त्यामुळं आधार कार्डवरचा तुमचा पत्ता बदलण्यासाठी एका सोप्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

सध्या कोणत्याही बॅंकेत अकाऊंट खोलण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे केवायसीशी लिंक करावे लागते. मात्र तुमचा केवायसी आणि आधार यांच्यावरचा पत्ता वेगवेगळा असेल तर त्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.

वाचा-चांद्रयान-2ने पाठवला चंद्राचा सर्वात सुंदर फोटो; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

ज्या लोकांना केवायसीसाठी आधार नंबर देताना वेगळा पत्ता देत असाल जो आधार कार्डवर नमुद नाही आहे. त्यासाठी आता फक्त तुम्हाला एक पत्र (self declaration) लिहावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही दुसरा पत्ता देऊ शकता.

या निर्णयाचा फायदा हा कामगारांसाठी तसेच, कामासाठी सतत स्थलांतर करणाऱ्यांना होणार आहे. स्थलांतर करणाऱ्या कामगारांना स्थायिक असलेल्या ठिकाणी बॅक खाते खोलण्यासाठी नेहमी नवा पत्ता द्यावा लागायचा. त्यामुळं आधार कार्डवर एक आणि बॅक खात्यासाठी दुसरा पत्ता असल्यामुळं त्यांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता असे करावे लागणार आहे. सरकारच्या वतीनं हा बदल मनी लॉंड्रिंगप्रकरणी प्रतिबंध नियम {Prevention of Money-laundering (Maintenance of Records} यानुसार करण्यात आला आहे.

वाचा-भारतीय लष्कराचं मोठं फर्मान, 'फेसबुक अकाउंट बंद करा'

या नियमामुळं कोणत्याही व्यक्तीला आधार कार्ड नंबर बरोबरच इतर सरकारी दस्ताऐवजांवर वेगळा पत्ता नमुद करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यासाठी त्या व्यक्तीला एका पत्रात याची नोंद करून द्यायची आहे. आधार कार्डबाबत या नियमात बदल करण्यासाठी स्थलांतरिक कर्मचाऱ्यांकडून मागणी होत होती.

वाचा-FD ऐवजी लोक इथे गुंतवतायत पैसे, तुम्हालाही होईल फायदा

सरकारच्या निर्णयाचा या लोकांना होणार फायदा

आधारबाबत सरकारनं घेतलेल्या या नियामाचा फायदा कामगार आणि स्थलांतरित कर्मचाऱ्यांना होणार आहे. काही लोकांकडे आधार कार्डसाठी एक मुळ निवास स्थानाचा पत्ता असतो, मात्र काम करत असलेल्या ठिकाणी बॅंक अकाऊंट खोलण्यासाठी एक वेगळा पत्ता द्यावा लागतो. जो अवैध ठरवला जातो. त्यामुळं अशा कामगारांचे काम आता फक्त एका पत्रामुळे होणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 14, 2019, 1:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading