मराठी बातम्या /बातम्या /देश /

Voter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी

Voter ID Aadhaar Link: आता आधार कार्ड मतदार कार्डशीही लिंक करावं लागणार, लोकसभेत मंजुरी

आज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

आज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

आज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : आज 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. या विधेयकाद्वारे लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. मागील आठवड्यात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बदलांना मंजुरी दिली होती.

मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे.

यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सामायिक मतदार यादी तयार करण्यात मदत होईल आणि अधिकाधिक पात्र तरुण मतदार बनतील. अधिक पात्र लोकांना मतदार म्हणून नोंदणी करता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोग अनेक कट-ऑफ डेट्ससाठी आग्रही आहे.

आतापर्यंत एखाद्या विशिष्ट वर्षात झालेल्या निवडणुकीसाठी, मतदार यादीमध्ये केवळ अशा व्यक्ती नॉमिनेट होण्यास पात्र आहेत, ज्याचं वय त्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. निवडणूक आयोगाने सरकारला यासाठी 1 जानेवारी ही निश्चित केलेली कट ऑफ तारीख अनेक तरुणांना निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित ठेवते. त्यामुळे ही कट-ऑफ तारीख आता चार वेळा करण्यात आली आहे.

Google Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती

कसं कराल लिंक -

- सर्वात आधी वेबसाइट https://voterportal.eci.gov.in/ वर जा.

- आपला मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वोटर आयडी नंबरद्वारे लॉगइन करा.

- त्यानंतर पासवर्ड टाका.

- राज्य, जिल्हा, पर्सनल डिटेल्स नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव टाका.

- डिटेल्स भरल्यानंतर Search वर क्लिक करा.

- त्यानंतर स्क्रिनवर डिटेल्स दिसतील.

- ‘Feed Aadhaar No’ वर क्लिक करा

- आता पॉप-अप पेज ओपन होईल. तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल टाका.

- सर्व डिटेल्स तपासून Submit वर क्लिक करा.

First published:

Tags: Aadhar card link, Voting