धक्कादायक! 3 मुलांसह रेल्वे ट्रॅकवर महिलेची आत्महत्या, थोडक्यात वाचलं 1 वर्षांचं बाळ

धक्कादायक! 3 मुलांसह रेल्वे ट्रॅकवर महिलेची आत्महत्या, थोडक्यात वाचलं 1 वर्षांचं बाळ

या महिलेनं आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केली, मात्र यात 2 मुलांचा मृत्यू झाला तर एकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : दिल्लीच्या मंडावली स्थानक परिसरात एक महिलेनं ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या महिलेनं आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केली, मात्र यात 2 मुलांचा मृत्यू झाला तर एकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांनी हा आत्महत्याचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली आहे. रात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात RPFची टीम घटनास्थळी दाखल झाली. ज्यावेळी RPFची टीम घटनास्थळी पोहचली तेव्हा 3 मुलांपैकी एकाची प्रकृती गंभीर होती. मात्र RPFच्या टीमनं लगेचच या मुलाला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिन्ही मृतहेद रेल्वे ट्रॅकवरून हटवण्यात आले.

रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी मिळाली. मृत महिलेचे नाव किरण असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, ही महिला रेल्वे कॉलनीमध्ये राहत असून, हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महिलेचे वय 30 वर्ष असून. मृत 2 मुलींचे वय 5 आणि 6 वर्ष आहे. तर, थोडक्यात बचावलेलं मुलं हे एका वर्षाचं होतं. सध्या तिन्ही मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आधी मृतांचा कोव्हिड चाचणी केली जाणार आहे. दरम्यान मृत महिलेच्या नवऱ्याचा आणि परिवाराचा शोध सुरू आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे)

First published: July 2, 2020, 11:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading