कधी आई, कधी बायको, कधी रिक्षाचालक; महिलेच्या कर्तव्यनिष्ठेला मानाचा मुजरा

कधी आई, कधी बायको, कधी रिक्षाचालक; महिलेच्या कर्तव्यनिष्ठेला मानाचा मुजरा

आधीच लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प. त्यात पतीला कोरोनाची लागण झाल्यानंतर संसार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न होता. मात्र ती खचली नाही.

  • Share this:

आग्रा, 9 जून : देशात अनलॉक सुरू झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र पुन्हा उभं राहणं हे इतकं सोपं नाही. अनेकांना मिळेल त्या परिस्थितीत खूप मेहनत करुन पुन्हा आयुष्याचा गाडा ओढावा लागत आहे.

आग्र्यातील एका महिलेला आपलं घर चालवण्यासाठी लहान लेकासह  ई-रिक्षा चालवावी लागत आहे. बाळाला मागच्या सीटवर ठेवून ती दिवसभर रिक्षा फिरवते. कसाबसा वेळ काढून मुलाला खाऊ-पिऊ घालते. तिच्या पतीवरही रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही स्त्री स्वतःमध्ये संघर्षाची एक संपूर्ण कथा आहे. आणि त्या लोकांसाठी एक धडा आहे, जे अगदी छोट्याशा संकटाने तुटतात.

घर चालविण्यासाठी ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय

आग्रा ते एमजी रोडवरील भगवान टॉकीज चौकापासून राजमुंडी या मार्गावर महिला रिक्षा चालवते. ही महिला एकत्र आई व पत्नी दोघांचीही कर्तव्य बजावत आहे. जेव्हा कुटुंब चालविण्याची महत्वाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली, तेव्हा 40 डिग्री तापमानात जीवनाच्या समोर उभं ठाकलेलं युद्ध लढण्याचा तिने निर्णय घेतला. पती रिक्षा चालवत असताना ती घर सांभाळत होती. दरम्यान तिच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. सध्या तिच्या नवऱ्यावर उपचार सुरु आहेत. घरात तीन मुलं आहेत. आर्थिक संकट आयुष्याच्या मार्गात अडथळा बनू शकलं नाही, असा तिचा विश्वास आहे. म्हणून तिने ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला तिच्या या निर्णयामुळे अनेक लोक आश्चर्यचकित झाले, परंतु जेव्हा तिची कहाणी त्यांना कळाली तर अगदी प्रवासीही तिला सॅल्यूट करतात.

हे वाचा-शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमावर होऊ शकतो परिणाम; HRD मंत्र्यांचं विधान

First published: June 9, 2020, 10:11 PM IST

ताज्या बातम्या