रेल्वे ट्रॅक पार करणाऱ्या महिलेला RPF जवानाने वाचवलं, मात्र स्वत:चं रेल्वेखाली सापडून मृत्यू

Railway

महिलेच्या जीवाला धोका असल्याचं पाहून जवानाने तातडीने धाव घेतली, मात्र दुर्देवाने यात त्याचा अंत झाला

  • Share this:
    कौशंबी, 4 मार्च : उत्तर प्रदेशातील कौशंबीमध्ये (Kaushambi) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेचा जीव वाचविण्यासाठी तैनात असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या जवानाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेच्या पायाला जखम झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे ट्रॅक पार करीत होती महिला कौशंबीतील भरवारी रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्री उशिरा निर्मला नावाची एक 40 वर्षीयमहिला रेल्वे लाइन क्रॉस करीत होती. यादरम्यान दिल्ली-प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन नेमकी त्याच ट्रॅकवर येत होती. महिलेला  अडचणीत पाहून ड्यूटीवर तैनात आरपीएफ हेड कॉन्स्टेबल ज्ञानचंद महिलेला वाचविण्यासाठी धावत पुढे गेले. त्यांनी महिलेला ट्रेनच्या समोर येण्यापासून वाचवलं, मात्र स्वत: ट्रेनखाली सापडले. (woman crossing railway track was rescued by RPF jawan, but came under the train) महिलेला वाचविण्यासाठी गेले होते तेव्हा अचानक कौशंबी एडिशनल एसपी समर बहादुर सिंह यांनी सांगितलं की, ही घटना मंगळवारी रात्री घडली. निर्मला नावाची महिला रात्री उशिरा रेल्वे लाइट क्रॉस करीत होती. दरम्यान आरपीएफ हेड कॉन्स्टेबलनी त्यांना वाचवलं मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रयागराज-दिल्ली ट्रेनने धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला. हे ही वाचा-सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना जानेवारीपासून नाही मिळाला पगार प्रशासनाने दिले तपासाचे आदेश प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल ज्ञानचंद यांच्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया येथे राहणारे ज्ञानचंद रेल्वे पोलीस दल आरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. महिला सुखरुप घटनेनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. येथे तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. महिलेने सांगितलं की ती सिराथू रेल्वे स्टेशनवर उतरून शीतला देवीच्या दर्शनासाठी जाऊ इच्छित होती. मात्र अंधार झाल्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही आणि ती भरवारी स्टेशनवर उतरली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published: