नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: एका जवानाची पत्नी कधीच असा विचार करत नाही की पुढे काय होईल... ही एक अशी भावना आहे जी व्यक्त करता येत नाही. धोका नेहमीच असतो आणि त्याला स्वीकारावं लागतं. एका जवानाप्रमाणे साहसी व्हावं लागते.... हे वाक्य आहे शहीद मेजर विभूती डोंडियाल यांची पत्नी निकीता कौल याचं . 14 फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यातून पाणी आले होते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी या हल्ल्यातील मास्टर माईंड असलेल्या दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलाने ठार मारले. या चकमकीत मेजर डोंडियाल शहीद झाले होते.
पुलवामा हल्ल्याची वेदना अद्याप प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना देखील या प्रसंगाला ते मोठ्या खंबीरपणे सामोरे जात आहेत. शहीद मेजर डोंडियाल यांची पत्नी निकीता यांनी सांगितले की, मला गर्व आहे माझे पती देशासाठी शहीद झाले. त्यांच्या निधनाचे दु:ख मोठेआहे. पण देश आणि नागरिकांसाठी त्यांनी त्याग केला याचा अभिमान वाटतो.
ज्यांनी बलिदान दिले...
ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्यापासून आपण सर्वांनी काही शिकले पाहिजे. जगात कोण कोणासाठी बलिदान देते हे सर्वात महत्त्वाचे असते. गरज नाही लष्करात असले पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असला तरी जे काम करता ते प्रामाणिकपणे केले पाहिजे. गोष्टी प्रामाणिकपणे केल्यास परिस्थिती बदलण्यास सुरुवात होते. तुम्ही प्रामाणिकपणे काम केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचतील, असेही निकीता कौल यांनी सांगितले.
I Love You म्हणत मेजर विभूती यांना दिला अखेरचा निरोप
पुलवामामध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत 55 राष्ट्रीय रायफलचे मेजर विभूती शंकर डोंडियाल शहीद झाले. डोंडियाल यांच्यासह अन्य 4 जवान देखील या चकमकीत शहीद झाले. मेजर डोंडियाल यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 'भारत माता की जय' आणि पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. शहीद डोंडियाल यांचे पार्थिव डेहराडूनमध्ये आणण्यात आले तेव्हा पत्नीने I Love You म्हणत त्यांना अखेरचा निरोप दिला.
मेजर विभूती यांनी एक वर्षापूर्वी फरीदाबाद येथील निकीता कौल यांच्याशी विवाह केला होता. निकीता कौल या मुळच्या काश्मीरच्या आहेत. त्यांचे कुटुंबीय काश्मीरमधून विस्थापित झाले होते. प्रथम विस्थापित झाल्याचे दु:ख आणि आता पतीच्या निधनामुळे निकीता मोठा धक्का बसला. विभूती आणि निकीता यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले होते. शहीद डोंडियाल यांच्या पार्थिवाकडे निकीता बराच वेळ पाहत होत्या. एकटक पार्थिवाकडे पाहून त्याजणू शहीद विभूतींशी बोलत होत्या. एकीकडे निकीताकडे पाहून नातेवाईकांच्या काळजाचं पाणी होत होतं, तर दुसरीकडे निकीता या विभूतींच्या भावविश्वात हरवून गेल्या होत्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या पतीला निकीता यांनी कपाळावर किस केलं आणि अखेरचा प्रवास सुरू होण्याआधी निकीता यांनी त्यांना I Love You म्हटलं.
#WATCH Wife of Major VS Dhoundiyal (who lost his life in an encounter in Pulwama yesterday) by his mortal remains. #Dehradun #Uttarakhand pic.twitter.com/5HWD6RXwnO
— ANI (@ANI) February 19, 2019
VIDEO : लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, नराधमाचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद