10 मे : युद्धनौकेवरून एकावेळी आठ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अवकाशात झेपावू शकतील, अशी रचना असलेले क्वॉड लॉन्चर विकसित करण्यात लार्सन अॅण्ड टुब्रोच्या संरक्षण विभागाला यश आले आहे.
युद्धनौकेवरून 300 किलोमीटरपर्यंत वेध घेण्याची या क्वॉड लॉन्चरची क्षमता असल्याने युद्धनौका तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने भारतीय नौदल पुढचे पाऊल टाकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
ब्राह्मोसच्या (सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल) क्षेपणास्त्रांकरता क्वाडरपल कॅनिस्टराइज्ड इनक्लाइन्ड लॉन्चरची काटेकोर चाचणी तळेगाव येथे घेण्यात आली.
क्वॉड लॉन्चर विकसित करण्यात यश
ब्राह्मोसच्या (सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल) क्षेपणास्त्रांकरता क्वाडरपल कॅनिस्टराइज्ड इनक्लाइन्ड लॉन्चरची काटेकोर चाचणी तळेगाव येथे घेण्यात आली. युद्धनौकेवर एकावेळी 2 (मागे व पुढे) लॉन्चर बसविता येतील. प्रत्येक लॉन्चरमध्ये चार क्षेपणास्त्रे ठेवता येतील, अशी रचना करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: क्षेपणास्त्र, जयंत पाटील, तळेगाव, भारत, मेक इन इंडिया, विकास