Home /News /national /

मोठी बातमी ! बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 18 प्रवाशांचा मृत्यू

मोठी बातमी ! बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 18 प्रवाशांचा मृत्यू

A truck rammed into a bus: भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

    लखनऊ, 28 जुलै : उत्तरप्रदेशातील बाराबंकी (Barabanki Uttar Pradesh) येथे रात्री उशीरा भीषण अपघात (Accident) झाला आहे. रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या डबल डेकर बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक (Truck rammed into Bus) दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी जाले आहेत. लखनऊ-अयोध्या महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ - अयोध्या महामार्गावर कल्याणी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. पुलावर डबल डेकर बस बंद पडली होती. बस बंद पडल्याने रस्त्याच्या शेजारी चालकाने उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर 7 प्रवाशांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कोरोनापासून बचावासाठी कोविशील्ड लस 93 टक्क्यांपर्यंत प्रभावी, मृत्यूदरात घट; केंद्र सरकारची माहिती जखमी प्रवाशांवर रामसनेहीघाट सीएचसी येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवाशांवर बाराबंकी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डबल डेकर ही खासगी ट्रॅव्हल्स बस हरियाणातून बिहारकडे जात होती, त्याच दरम्यान रामसनेहीघाट पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या कल्याणी नदीच्या पुलावर बस बंद पडली. बसचा एक्सेल तुटल्याने बस बंद पडली होती. बस बंद पडल्याने काही प्रवासी बसमधून खाली उतरले होते त्याच दरम्यान मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या