घराच्या छतावर पलटला सामानाने भरलेला ट्रक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 गंभीर

घराच्या छतावर पलटला सामानाने भरलेला ट्रक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 गंभीर

ज्या वेळेस हा अपघात घडला त्या वेळी 6 लोक घरात होते.

  • Share this:

बिलासपुर, 23 नोव्हेंबर : हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर (Bilaspur) जिल्ह्यात एक विचित्र अपघात (Accident) घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 5 जणं गंभीर जखमी झाले आहे. हिमाचलमधील घरावर ट्रक पलटल्याने दोन जणांचा मृत्यू आणि 5 गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खासगी कंपनीचा एक ट्रक सामान घेऊन कुंडूहून चंदीगडकडे जात होता. ट्रक अनियंत्रित झाल्याने हायवेशेजारील घराच्या छतावर ट्रक पलटला. ज्या वेळेस हा अपघात घडला त्या वेळी 6 लोक घरात होते, त्यातील तीन लोक गंभीर जखमी झाले आहे.

हा अपघात घडला त्याचवेळी ट्रकमध्ये चालकासह चार जण होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताचे कारण शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर जखमी लोकांना बिलासपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-74 वर्षीय व्यक्तीने मगरीच्या तोंडातून कुत्र्याला काढलं बाहेर; पाहा Viral Video

एका जखमीची तब्येत गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला आयजीएमसी शिमलाला रेफर केले तर इतरांना चंदीगड पीजीआय येथे पाठविण्यात आले आहे. एसपी बिलासपुर दिवाकर शर्मा यांनी अपघाताची पुष्टी केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 23, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या