Home /News /national /

कांद्याने केला वांदा! नगरमधून कांदा घेऊन निघालेला ट्रकच महिनाभरापासून गायब

कांद्याने केला वांदा! नगरमधून कांदा घेऊन निघालेला ट्रकच महिनाभरापासून गायब

कोच्चीचे व्यापारी मोहम्‍मद सियाद यांनी अहमदनगरमधून 25 क्विटंल कांदा खरेदी केला होता. आजच्या बाजारभावाने त्याची किंमत तब्बल 50 लाख होत असल्याचं त्यांचा दावा आहे.

    नवी दिल्ली 30 ऑक्टोबर: देशात कांद्याचे भाव (Onion Price) सध्या आकाशाला भीडले आहेत. त्यामुळे त्याला सोन्याचा भाव आलाय. कांद्याने शंभरी केव्हाच पार केली असून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. केरळमधला एका व्यापाऱ्याचं तर दिवळच निघण्याची वेळ आली असून त्याने महाराष्ट्रातून बोलावलेला 25 टन कांदा ट्रकसह गायब आहे. गेल्या महिनाभरापासून ट्रकचा काही ठाव ठिकाणाच लागत नसल्याने व्यापारी हावालदील झाला आहे. केरळमधल्या कोच्चीचे व्यापारी मोहम्‍मद सियाद यांनी अहमदनगरमधून 25 क्विटंल कांदा खरेदी केला होता. आजच्या बाजारभावाने त्याची किंमत तब्बल 50 लाख होत असल्याचं त्यांचा दावा आहे. नगरमधल्या सहकारी संस्थांकडून त्यांनी हा कांदा खरेदी केला होता. नगरवरून कोच्चीला पोहोचायला 8 दिवस लागतात. मात्र महिना झाला तरी ट्रक कोच्चीला पोहोचलाच नाही. शेवटी व्यापाऱ्याने पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला आहे. ट्रक ड्रायव्हरचा फोन लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. अहमदनगरवरून तो ट्रक कांदी भरून निघाल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं.  'हिंदुस्थान टाईम्स'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ट्रक ड्रायव्हरने संगनमत करून तो कांदा विकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांनी शेजारच्या सर्व राज्यांना त्या ट्रकबाबत माहिती दिली आहे. त्या ट्रक ड्रायव्हरची माहिती घेतली असता त्याने या आधीही ट्रकमधून काही माल विकल्याचं आढळून आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून कांदा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. कांद्याचे भाव नियंत्रणात राखण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. तर काही दिवसांपूर्वीच सरकारने कांद्याच्या बियाणांच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. आणखी दोन महिने भाव असेच चढे राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Onion

    पुढील बातम्या