मराठी बातम्या /बातम्या /देश /

FB लाईव्ह करत व्यापाऱ्यानं मध्यरात्री कापली हाताची नस; ऐनवेळी पोलिसांनी पाहिला व्हिडिओ, मग...

FB लाईव्ह करत व्यापाऱ्यानं मध्यरात्री कापली हाताची नस; ऐनवेळी पोलिसांनी पाहिला व्हिडिओ, मग...

एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकीकडे गौरीचं आगमन झालं आहे, या उत्सवाच्या काळात माहेरी आलेल्या महिलेनं आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मध्यरात्री फेसबूक लाइव्ह (Facebook live at midnight) करून हाताची नस कापून घेणाऱ्या एका व्यापाराला (Trader cut his wrist vein) स्पेशल सेलच्या क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी शिताफीने वाचवलं (Police save his life) आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 05 जून: मध्यरात्री फेसबुक लाइव्ह (Facebook live at midnight) करून हाताची नस कापून घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला (Trader cut his wrist vein) स्पेशल सेलच्या क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी शिताफीने वाचवलं (Police save his life) आहे. पोलिसांना आणखी काही मिनिटे उशीर झाला असता, तर संबंधित व्यापाऱ्याचा जीव गेला असता. पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संबंधित आत्महत्या करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव हिरा असून तो मिठाईचा व्यापारी आहे. तो आपल्या दुकानात वेगवेगळ्या मिठाईचे पदार्थ बनवण्याच काम करतो. पण मागील काही काळापासून पीडित व्यक्ती हिरा तणावाखाली होते. यातूनचं त्यांनी गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास फेसबुक लाइव्ह करत हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलत पीडित व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

खरंतर, व्हिडीओ पाहिल्यानंतर, संबंधित व्यक्ती नेमकी कोण? आणि कुठे राहाते याची काहीही माहिती पोलिसांकडे नव्हती. पण त्याच्या फेसबुक प्रोफाइल आणि अन्य गोष्टीच्या माध्यमातून पोलिसांनी व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी संबंधित आत्महत्या करणारी व्यक्ती पालम गावातील रहिवासी असल्याचं कळालं. यानंतर पोलिसांनी तातडीने पावलं उचलतं. पालम गावातील स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला त्वरित रुग्णालयात हलवलं आहे.

हे ही वाचा-औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची हत्या; साडूनेच मित्राच्या मदतीने संपवला खेळ

तोपर्यंत पीडित व्यक्तीचं बरंच रक्त वाहिलं होतं. आणखी थोडासा जरी विलंब झाला असता, तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संबंधित व्यक्तीने आत्महत्या करण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हिरा यांवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार असून जिवीताचा धोका टळला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Delhi, Facebook, Suicide