25 शाळांमध्ये शिकवून 1 कोटी पगार घेणाऱ्या शिक्षिकेचा घोटाळा झाला उघडं, आता पोलीस घेतायेत शाळा

25 शाळांमध्ये शिकवून 1 कोटी पगार घेणाऱ्या शिक्षिकेचा घोटाळा झाला उघडं, आता पोलीस घेतायेत शाळा

सर्व शिक्षकांचा रोजचा डिजिटल डेटाबेस असूनही असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

कासगंज, 6 जून : एकच शिक्षिका 25 शाळांमध्ये काम करते ही बाब कोणालाच नाही पटणार, पण हे खरंच घडलं आहे. बरं इतकंच नाही तर काही महिन्यांमध्ये या शिक्षिकेने एक कोटी रुपये पगारही मिळवला आहे. हे अशक्य वाटतं, पण वास्तवात घडलं आहे. सर्व शिक्षकांचा रोजचा डिजिटल डेटाबेस असूनही असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही शिक्षिका उत्तर प्रदेशच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पूर्णवेळ काम करत होती. पण त्याचसोबत आंबेडकर नगर, बागपत, अलिगड, सहारनपूर आणि प्रयागराज यासारख्या जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये याच नावाची शिक्षिका काम करत असल्याचं समोर आलं. शिक्षकांचा डेटाबेस तयार केला जात असताना ही बाब उघडकीस आली नाही. या शिक्षिकेचं नाव अनामिका सिंग असून तिला शनिवारी अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीच्या 25 शाळांमध्ये खोटी माहिती देऊन ही महिला काम करीत होती. ही शिक्षिका  अनामिका शुक्लाच्या नावावर बेकायदेशीरपणे काम करीत होती. अनामिका सिंगच्या चौकशीत काही मोठे खुलासे होऊ शकतात.

कासगंजमध्ये बेकायदेशीरपणे काम करणारी अनामिका सिंह राजीनामा देण्यासाठी कार्यालयात आली होती. राज नावाच्या एका व्यक्तीने अनामिका सिंग हिला बेकायदेशीरपणे नोकरी लावली होती, अशी माहिती समोर आली आहे. जी सध्या कासगंजच्या फरीदपूरमधील कस्तूरबा गांधी शाळेत तैनात होती. बनावट कागदपत्रांद्वारे तिने अनामिका शुक्लाच्या नावावर नोकरी मिळवली होती. अनामिका सिंह कासगंजच्या फरीदपूर, कस्तूरबा विद्यालयात विज्ञान शिक्षिक म्हणून  पूर्णवेळ काम करीत होती. प्राथमिक शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या  सूचनेवरून अनामिका सिंह नावाच्या शिक्षकेचा जिल्ह्याभरात शोध सुरू होता. शुक्रवारी एज्युकेशन ऑफिसरने (बीएसए) शिक्षिकाचा पगार थांबवला व तिच्याविरोधात नोटीस जारी केली.

शुक्रवारी संध्याकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिली तेव्हा दुसऱ्या दिवशी ती राजीनामा देण्यासाठी आज सकाळी बीएसए कार्यालयाबाहेर पोहोचली. तिने राजीनाम्याची एक प्रत आपल्या सोबत आलेल्या युवकामार्फत बीएसएला पाठविली. त्या शिक्षिकेबद्दल या तरुणाला विचारणा केली असता त्याने सांगितले की अनामिका सिंह बाहेर रस्त्यावर उभी आहेत. यावर बीएसए अंजली अग्रवाल यांनी सोरो पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तिला पकडण्यात आले आणि सोरों ठाण्याला सोपविण्यात आले. सध्या पोलीस आरोपी अनामिका सिंहची चौकशी करीत आहे.

हे वाचा-चीनविरोधात केलेल्या जाहिरातीमुळे अमूल अडचणीत; ट्विटरने अकाऊंट केलं ब्लॉक

 

 

First published: June 6, 2020, 7:22 PM IST

ताज्या बातम्या