UPSCचा अभ्यास करणाऱ्या 1,000 विद्यार्थ्यांना घेऊन स्पेशल ट्रेन आज पुण्यात येणार

UPSCचा अभ्यास करणाऱ्या 1,000 विद्यार्थ्यांना घेऊन स्पेशल ट्रेन आज पुण्यात येणार

युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागांतून दिल्लीत मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात.

  • Share this:

नवी दिल्ली 17 मे: केंद्रीय लोकसेवा आयोग(युपीएससी) परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या व कोराना संकटामुळे दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना घेवून विशेष रेल्वे आज पुण्यात पोहोचणार आहे. शनिवारी रात्री 10 वाजता येथील पुरानी दिल्ली रेल्वे स्थानाकाहून ही गाडी पुण्याकडे रवाना झाली होती.

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना परत आणण्याची देशातील ही पहिलीच मोहीम आहे. युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणात महाराष्ट्राच्या विविध भागांतून दिल्लीत मोठया प्रमाणात विद्यार्थी येत असतात. येथील राजेंद्रनगर, करोलबाग, पटेलनगर, मुखर्जीनगर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या भागात युपीएससीचे क्लासेस करून हे विद्यार्थी वास्तव्यास असतात.

सध्या देशात व विशेषत: दिल्लीत कोरोनाच्या संकटामुळे स्थिती बिकट झाली आहे. संपूर्ण दिल्ली रेड झोन मध्ये असून लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवस्थाच बंद असल्याने या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळए महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांना स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त निवडक स्टेशनवरच ही गाडी थांबणार आहे.

कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप

लॉकडाऊन 3.0 संपायला आता केवळ १ दिवस राहिला आहे. सोमवारपासून 4.0 सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन 4.0चे संकेत दिले होते. मात्र हा लॉकडाऊन पूर्णपणे वेगळा असेल असंही त्यांनी सांगितलं होतं. हा लॉकडाऊनही 15 दिवसांचा असणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

या लॉकडाऊनमध्ये अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. उद्योग सुरू करण्याबाबात आणखी सुट मिळू शकते. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतूक आणि कॅबलाही परवानगी मिळू शकते. शाळा कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

... आणि पायी चालत जात राहुल गांधी यांनी घेतली मजुरांची भेट

 मॉल्स, हॉटेल्स आणि बाजारही बंदच राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांना पूर्वीप्रमाणेच सुट राहणार आहे. नवा लॉकडाऊन कसा असावा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिवसभर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.

First published: May 17, 2020, 7:12 AM IST

ताज्या बातम्या