तुम्ही कालिया आणि सुंदरीच्या लग्नाला गेला होतात का?

तुम्ही कालिया आणि सुंदरीच्या लग्नाला गेला होतात का?

सध्या देशभरात लग्नाचा हंगाम सुरु आहे. या हंगामात आदिवासी भागातलं एक लग्न मात्र देशभरात चर्चेचा विषय ठरलंय. होय, छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा शहरात कालिया आणि सुंदरीचं लग्न पार संपन्न झालं.

  • Share this:

07 मे : सध्या देशभरात लग्नाचा हंगाम सुरु आहे. या हंगामात आदिवासी भागातलं एक लग्न मात्र देशभरात चर्चेचा विषय ठरलंय. होय, छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा शहरात कालिया आणि सुंदरीचं लग्न पार संपन्न झालं.

कालिया आणि सुंदरीचा हा लग्नसोहळा संपन्न करण्यासाठी छत्तीसगड राज्यातल्या दंतेवाडा जिल्ह्यातले शेकडो आदिवासी सहकुटुंब वऱ्हाडी झालेत. वर कालिया आणि वधु सुंदरी हे दुसरे तिसरे कोणी नसून दंतेवाडा जिल्ह्यात आढळणारे कडकनाथ जातीचे कोंबडा-कोंबडी आहेत. त्यांच्या लग्नाचा हा सोहळासुद्धा प्रशासन प्रायोजित आहे.

कालिया आणि सुंदरीला लग्नासाठी माणसाच्या वधूवराप्रमाणं सजवलं आहे. त्यांना मुंडावळ्या बांधून हळदही लावली. त्यानंतर वधुवराकडील मंडळींचा गाठी-भेटीचा कार्यक्रम झाला. जवळच्या कासोली इथल्या इंद्रावती बचत गटाच्या कुक्कुटपालन संस्थेतली सुंदरी आता वधू बनून शेजारच्या गावातल्या एका शेतकरी गटाच्या कुक्कुटपालन संस्थेत चालली आहे.

या लग्नसोहळ्यासाठी दंतेवाडाचं जिल्हा प्रशासनसुद्धा झटत होतं. त्यांनी आदिवासी बांधवांना सगळ्या सुविधा देत लग्न यथायोग्य पार पाडण्यास मदत केली आहे. कडकनाथ कोंबड्यांचं संगोपन वाढीस लागावं या यामागचा उद्देश असल्याचं दंतेवाडाच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सध्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकार कडकनाथ कोंबडीचं संगोपन, संवर्धन आणि तिच्या मार्केटिंगसाठी पुढं सरसावलेत. त्याचाच एक भाग म्हणून दंतेवाड्यात हे अनोखं लग्न पार पडलंय.

संकरित कोंबड्यांना पर्याय म्हणून देशभरातले कुक्कुटपालक सध्या काळ्या रंगाच्या आणि काळं रक्त असलेल्या या देशी कोंबडीच्या संगोपनाकडं वळतायत. त्याला या न त्या मार्गानं प्रमोट करण्यासाठीच दंतेवाडा प्रशासनानं हा खटाटोप केलाय.

दंतेवाड्यात झालेल्या या अनोख्या लग्नामुळं कडकनाथचं मूळ असलेल्या या जिल्ह्याचं देशभर मार्केटिंग होण्यास मदत मिळणार आहे. या भागातल्या आदिवासींकडून कडकनाथचं संगोपन वाढलं तर त्यांची आर्थिक उन्नती वेगानं होण्यास मदत मिळणाराय. त्यासाठीच हा लगीनसोहळा संपन्न झाला आहे.

 

First published: May 7, 2018, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading