Home /News /national /

या महिलेनं तृतीयपंथीयांसाठी चक्क विकले लाखांचे दागिने, आता बांधून देणार घर

या महिलेनं तृतीयपंथीयांसाठी चक्क विकले लाखांचे दागिने, आता बांधून देणार घर

तृतीयपंथी समूह माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी दीर्घकाळापासून झगडतो आहे. त्यात त्यांना अनेकांनी मदतीचा हातही दिला आहे.

    लखनौ, 9 जानेवारी : तृतीयपंथी समूहाचं (transgender community) जगणं कायमच संघर्षानं (struggle) भरलेलं असतं. मात्र समाजातील अनेक संवेदनशील लोक त्यांच्या जगण्यात जमेल तसा आनंदाचा शिडकावा करत त्यांना आधारही देताना दिसतात. रंजना अग्रवाल हे असंच एक नाव. रंजना गेल्या पाच वर्षांपासून उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या जगण्याचा संघर्ष पाहत होत्या. या समुदायाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी त्यांनी आपले दागिनेदेखील विकले. रंजना यांनी जणू आपलं आयुष्यच तृतीयपंथी समूहासाठी समर्पित केलं आहे. आपले दागिने (jewellery) विकत त्यांना दोन लाख रुपये मिळाले. त्यातून त्या जमीन खरेदी करून (purchased land) एक असा एक निवारा बनवत आहेत ज्यातून किमान 20 तृतीयपंथियांच्या राहण्याची सोय होऊ शकेल. या समूहाला सामाजिक जीवनात प्रतिष्ठा मिळावी यासाठीच्या लढ्यातील हे छोटंसं पाऊल असल्याचं रंजना सांगतात. रंजना यांनी ही जमीन बुलंदशहरच्या बाहेरच्या परिसरात घेतली आहे. त्यांनी सांगितलं, 'मी मागच्या 5 वर्षात हे पाहिलं, की या समुदायाच्या राहण्याच्या ठिकाणा नसतो. त्यातून इतर विविध गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. लोक या समूहाला भाड्याचं घरही देत नाहीत. या समूहाला सहजपणे नोकरी किंवा लहानसहान कामही अजिबातच मिळत नाही. महिला कल्याण समिती या एनजीओच्या (NGO) सचिव असलेल्या रंजना आपल्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहतात. या घरात त्यांच्यासह त्यांचे पती, दोन मुलं आणि सासरचे लोक राहतात. हे ट्रान्सजेंडर्ससाठी बनलेलं उत्तर प्रदेशातलं पाहिलं आश्रयस्थळ असेल. राहण्याची समस्याच सुटली तर इतर आवश्यक गरजा आणि जगण्यातील प्रगतीकडे हा समूह लक्ष देऊ शकेल असा रंजना यांना विश्वास वाटतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Transgender, Uttar pardesh

    पुढील बातम्या