मराठी बातम्या /बातम्या /देश /

हिंदू-मुस्लीमांमध्ये फूट पाडणाऱ्यांना एक सणसणीत चपराक; काश्मिरातील PHOTOS पाहून हृदय पिळवटून निघेल

हिंदू-मुस्लीमांमध्ये फूट पाडणाऱ्यांना एक सणसणीत चपराक; काश्मिरातील PHOTOS पाहून हृदय पिळवटून निघेल

हिंदू-मुस्लीम एकतेवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना हे उत्तर आहे.

हिंदू-मुस्लीम एकतेवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना हे उत्तर आहे.

हिंदू-मुस्लीम एकतेवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना हे उत्तर आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

श्रीनगर, 14 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामामधून हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) एकतेचं चित्र पाहायला मिळालं. पुलवामामधील वाहीबुघ गावात राहणाऱ्या काश्मीरी पंडिताच्या निधनानंतर स्थानिक मुस्लीमांनी त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

सांगितलं जात आहे की, वाहीबुघमध्ये काश्मीरी पंडितांचं एकच कुटुंब राहतं. 80 वर्षीय कन्या लाल आपल्या कुटुंबासह वाहीबुघमध्ये राहत होते. कन्या लाल यांचं निधन झालं आहे. यानंतर संपूर्ण गाव एकत्र आलं आणि त्यांनी हिंदू पद्धतीप्रमाणे कन्या लाल यांच्यावर अंत्यसंस्कार केले. काश्मीरी पंडित विस्थापित झाल्यानंतर कन्या लाल येथेच थांबले होते. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी गाव सोडलं होतं. बरेच धोके असतानाही त्यांनी गाव सोडलं नाही. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (A slap in the face to those who divide Hindus and Muslims heartbreaking to see PHOTOS in Kashmir)

कन्या लाल यांनी सुरक्षा घेण्यापासून दिला होता नकार

ऑक्टोबरमध्ये जेव्हा काश्मीरात अल्पसंख्याकांवर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा अधिकाऱ्यांनी कन्या लालव यांना सुरक्षा घेण्याची विनंती केली. मात्र कन्या लाल यांनी यास नकार दिला. शनिवारी जेव्हा कन्या लाल यांचं निधन झालं, त्यावेळी न केवळ मुस्लीम शेजारी अंत्यसंस्कारासाठी हजर होते तर संपूर्ण गावातील महिला त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाल्या.

कन्या लाल यांचा भाऊ म्हणाला की, मी गावकऱ्यांचा आभारी आहे. त्यांनी काश्मीरात धार्मित सद्भावनेला जिवंत ठेवलं. ते पुढे म्हणाले की, मी जम्मूमधून आलो. मी गावकऱ्यांचा आभारी आहे की त्यांनी मला मदत केली. हिंदू-मुस्लीमांमधील सलोख्याच्या या उदाहरणामुळे काश्मीरमधील घाटात राहणाऱ्यांना सुरक्षा आणि उमेद मिळवून दिली.

First published:

Tags: Hindu, Jammu and kashmir, Muslim