टीव्ही मालिका पाहताना 7 वर्षांच्या चिमुकलीने स्वत:ला पेटवलं

टीव्ही मालिका पाहताना 7 वर्षांच्या चिमुकलीने स्वत:ला पेटवलं

प्रार्थना असं मयत मुलीचं नाव आहे. प्रार्थना ही कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर गावाची रहिवाशी होती. ती सेंट झेवियर्स या स्थानिक शाळेत दुसरीत शिकत होती

  • Share this:

बेंगळुरू,29 नोव्हेंबर: 7 वर्षांच्या मुलीने टीव्ही पाहता पाहता स्वत:ला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे नक्की कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. या आगीतच या मुलीचा मृत्यू झाला आहे

प्रार्थना असं मयत मुलीचं नाव  आहे. प्रार्थना ही कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील  हरिहर गावाची रहिवाशी होती. ती सेंट झेवियर्स या स्थानिक शाळेत दुसरीत शिकत होती. तिच्या घरची परिस्थिती ही नाजूक असल्याची माहिती मिळते आहे.

जेव्हा तिने स्वत:ला आग लावली तेव्हा ती टीव्हीवर नंदिडेदी ही कन्नड  मालिका पाहत होती. त्या मालिकेतील एका पात्राने स्वत:ला आग लावून घेतली आणि नंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला.तसंच प्रार्थनानीही केलंय.

आता स्वत:ला आग लावण्यामागे काही अजून कारणं आहेत का या गोष्टीचा तपास पोलीस घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 05:13 PM IST

ताज्या बातम्या