वीजेच्या तारेवर अडकलेल्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात आईला यश येईल? पाहा VIDEO

वीजेच्या तारेवर अडकलेल्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात आईला यश येईल? पाहा VIDEO

आई स्वत:चा जीव धोक्यात घालून पिल्लाला वाचवते असा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 मे : लॉकडाऊनदरम्यान अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ डोळे ओले करतात तर काही मनमुराद हसवतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. या लॉकडाऊनमुऴे अनेक प्राणी रस्त्यावर आणि मानवी वस्त्यांमध्ये खाण्याच्या शोधात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. हरीण, वाघ, डुक्कर मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. काही दिवसांपूर्वी एका माकडाच्या पिल्लानं लहान मुलाचं अपहरण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आता आणखीनं एका माकडचाळे करताना अडकलेल्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खाण्याच्या शोधात असलेलं हे माकडाचं पिल्लू आईची नजर चुकवून मस्ती करत जात होतं त्यावेळी अचानक ते वीजेच्या तारेवर अडकलं आणि तिथून आपल्या आईकडे जाणं त्याला कठीण झालं. पिल्लू अर्ध्यावर अडकल्याचं पाहून आईचा जीव मेटाकुटीला आला. आई पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड करू लागली. अडकलेल्या पिल्लाचं रेस्क्यू ऑपरेशन कसं करत आहे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO

पिल्लाला वाचवण्यासाठी आई तारेवर जाण्याचा प्रयत्न करते मात्र तार जोरात हलायला लागल्यानं पिल्लू घाबरतं. त्यामुळे आई पुन्हा माघार घेते. पिल्लाला धीर देत हळूहळू पुढे येण्यासाठी सांगते. पिल्लू खूप उंचावर असल्यानं आणि उडी मारण्याचा अंदाज नसल्यानं घाबरतं. आई हळू धीर देत त्याला पुढे येण्यासाठी बळ देते.

IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ 68.1 हजार लोकांनी पाहिला आहे तर 9.5 युझर्सनी लाईक केला आहे. पिल्लाला हजार तऱ्हेनं बळ देऊनही जेव्हा ते डगमगतं आणि पडायची आईला भीती वाटते तेव्हा आई स्वत:चा जीव धोक्यात घालून पिल्लाला वाचवते असा हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 18, 2020, 7:54 PM IST

ताज्या बातम्या