2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए राजा,कनिमोळींची निर्दोष मुक्तता

विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी तीन प्रकरणांची सुनावणी केली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 01:03 PM IST

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी  ए राजा,कनिमोळींची निर्दोष मुक्तता

21 डिसेंबर:    2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने माजी टेलिकॉम मंत्री  ए राजा आणि करूणानिधी यांच्या कन्या कनिमोळी यांच्यासह  सर्व आरोपींना   पुराव्याअभावी  एका खटल्यात निर्दोष मुक्त केलं आहे. 2008 साली पुढे आलेल्या या घोटाळ्यात द्रमुकचे राजा आणि कनिमोळा हे दोन नेते प्रमुख आरोपी होते.  यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे.

 

सहा वर्षांनंतर नवी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्ट समोरील विशेष सीबीआय न्यायालयाने 2 जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणी आपला निर्णय दिला आहे. विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी तीन प्रकरणांची सुनावणी केली आहे.  सीबीआयने  आणि इन्फॉर्मेशन डायरेक्टोरेट (ईडी) ने आणखी दोघांची चौकशी केली होती.

2007 मधील  हा खटला आहे.  2 जी दूरसंचार स्पेक्ट्रमसाठी परवाना वाटपामध्ये अनियमिततेचा आरोप  करण्यात आला होता.  ए राजा यांना मंत्री म्हणून, दूरसंचार मंत्रालयाने 2 जी स्पेक्ट्रम परवान्यासाठी अर्ज आमंत्रित केले होते.  तर 25 ऑक्टोबर 2007 पर्यंतची मुदत दिली होती. पण जानेवारी 10, 2008 रोजी दूरसंपर्क विभागाने एक प्रसिद्धी पत्र जारी केले ज्यात असे म्हटले होते की ते प्रथम येत्या प्रथम सेवा (एफसीएफएस) आधारावर 2 जी परवाने जारी करीत होते. याप्रकरणी घोटाळा झाल्याचं नंतर कॅगच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं होतं.

त्यामुळे  आता सीबीआय काय पाऊलं  उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...