मुंबई, 8 फेब्रुवारी : ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. त्याला कारण ठरलं आहे रहमानची मुलगी. बुधवारी ए. आर. रहमाननं निता अंबानी आणि त्याच्या मुलीचा फोटो ट्विट केला. त्या ट्विटमध्ये रहमाननं निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा असं ट्विट केलं. शिवाय, त्यावेळी #freedomtochoose असा हॅशटॅगही वापरला होता. पण, या फोटोमध्ये खतिजाने बुरखा घातला आहे. त्यामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी रहमानला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
रहमानच्या या ट्विटनंतर काहींनी त्याच्यावर टीका केली. एकानं बुरख्यात कसलं स्वातंत्र्य? असा सवाल केला आहे. काहींनी बुरखा घालण्यावर आक्षेप घेत रहमानला ट्रोल केलं आहे. तर, काहींनी रहमानच्या मुलीच्या कृतीचं समर्थन करत आपल्या देशात कुणी काय घालायचं? कसं राहायचं? याचं स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं आहे.
कुठे होता कार्यक्रम?
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला बॉलिवुडच्या अनेक दिग्गजांची हजेरी होती. रहमानची मुलगी खतिजा देखील यावेळी कार्यक्रमाला हजर होती. त्यावेळी निता अंबानी यांच्यासोबत तिनं फोटो काढला. दरम्यान, त्या फोटोवरून रहमान ट्विटरवर ट्रोल झाला आहे.
ट्विटरवर सेलिब्रेटी ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक सेलिब्रेटिंना विविध मुद्यांवरून ट्रोल करण्यात आलं आहे.
VIDEO : जेव्हा घाटकोपर रेल्वे स्टेशनवर अवतरले साक्षात 'यमराज'! तुम्हाल भेटले का?