भाजपच्या तिरंगा रॅलीत राडा, आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारीचे ओढले केस

भाजपच्या तिरंगा रॅलीत राडा, आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारीचे ओढले केस

शहरात जमाबंदी लागू (कलम 144) असताना भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढली.

  • Share this:

भोपाळ, 19 जानेवारी: मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यात रविवारी सीएएच्या समर्थनात भाजपने आंदोलन केले. शहरात जमाबंदी लागू (कलम 144) असताना भाजप कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढली. राजगड जिल्हा मुख्यालयासमोर रॅली आली असता राडा झाला. आंदोलकांना थेट राजगडच्या महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. यावरून भाजप कार्यकर्ते आणि महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राजगड जिल्हा मुख्यालयासमोर रॅली आली असता जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. निधी निवेदिता यांनी एका भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली. निधी निवेदिता यांनी भाजप नेत्यावर हात उचलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर वाद आणखी चिघळला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये 2 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी या सगळ्या घटनेनंतर 8 ते 10 भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, साीएएच्या समर्थनात भाजपने काढलेली रॅलीला परवानगी देण्यात आली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2020 07:53 PM IST

ताज्या बातम्या