अहमदाबाद, 12 नोव्हेंबर: भारतात असं एक ठिकाण आहे, जिथल्या (A place where gravity does not work) चढावर न्यूट्रल कारदेखील आरामात चढते, असं म्हटलं जातं. निसर्गाचा चमत्कार असलेली अनेक ठिकाणं भारतात बघायला मिळतात. त्या त्या ठिकाणी असं काहीतरी (Miraculous incidences in India) घडत असतं, की जे नेहमीपेक्षा चमत्कारिक आहे, असं वाटतं. अनेकदा त्यामागचं शास्त्रीय कारण माहित नसतं किंवा काही वेळा लोकांचा भ्रम तयार होत असतो. गुजरातमध्ये (Magical place in Gujrat) असंच एक ठिकाण आहे, जिथं गुरुत्वाकर्षच नसल्याचं सांगितलं जातं.
उताराप्रमाणे कार चढते चढण
न्यूट्रल कार जर एखाद्या उतारावर उभी केली, तर ती हळूहळू खाली उतरत राहणं साहजिक आहे. मात्र या भागाउताराप्रमाणे कार चढते चढणत चढणीपाशी उभी केलेली न्यूट्रल कार आपोआप चढण चढून वर जात असल्याचं सांगितलं जातं. ही जागा आहे गुजरातमध्ये. तुलसीश्याम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जागेबाबत अनेक किस्से सांगितले जातात.
चमत्कार की विज्ञान?
जोपर्यंत एखाद्या गोष्टीमागचं विज्ञान समजत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचा चमत्कार मानलं जातं. तुलसीश्यामबाबतही असाच काहीसा प्रकार घडत असल्याचं चित्र आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षच नसल्याची जोरदार चर्चा आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर ज्याप्रमाणं कुठलीही गोष्ट तरंगत राहते, त्याप्रमाणे या भागातदेखील चढावर कार आपोआप चढून जात असल्याचं सांगितलं जातं. अनेकांना यामागे भूतप्रेतांचं कारण वाटतं, तर अनेकांना हा कृष्णाचा महिमा आहे, असं वाटतं.
हे वाचा-चालती बस मध्येच थांबवून ड्रायव्हर झाला गायब, थोडक्यात बचावले प्रवासी
हे आहे वैज्ञानिक कारण
या घटनांमागे वैज्ञानिक कारण वेगळंच असल्याचं सांगितलं जातं. या भागातील सुंदर निसर्गामुळे इथल्या रस्त्यांबाबत भ्रम निर्माण होत असल्याचं वैज्ञानिक सांगतात. इथला रस्ता हा क्षितिजाशी जोडला गेल्यामुळे प्रत्यक्षात असणारा उतार हा नजरेला चढ असल्याप्रमाणे भासतो. प्रत्यक्षात न्यूट्रल कार उतारावरून खाली उतरत असते,, मात्र जणूकाही कार चढ चढून वर जात असल्याचा भास होतो. भारतात अशा अनेक जागा असल्याचंही सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.