दीपिका पदुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटी बक्षीस- भाजप नेता

दीपिका पदुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटी बक्षीस- भाजप नेता

दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचे बक्षीस देऊ, आणि त्याच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करु, असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणा भाजप प्रदेश मीडिया संयोजक सूरज पाल अम्मू यांनी केलं आहे.

  • Share this:

20 नोव्हेंबर: दीपिका पादुकोणला भाजप नेत्याने उघड धमकी दिली आहे. दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचे बक्षीस देऊ, आणि त्याच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करु, असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणा भाजप प्रदेश मीडिया संयोजक सूरज पाल अम्मू यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे, या सगळ्या प्रकरणात पंतप्रधानांवरही हल्ला चढवला जातोय. पाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला जातो आहे. मोदींना उद्देशून पाल म्हणाले की, मतांसाठी राजपूत, मुस्लीमांवर जरब बसवण्यासाठी राजपूत, आणि मतं मिळाल्यानंतर, याच राजपूतांचा अपमान होतोय. यावर मोदी गप्प. मोदीजी! आता तुम्हाला काहीतरी बोललं पाहिजे असं विधान सुरज पाल अम्मू यांनी केलं आहे.

पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आधीच सिनेनिर्मात्यांकडून स्पेशल मीडिया स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकावी लागली आहे. त्यातच आता सुरज पाल अम्मू यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. पद्मावती सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 63 दिवस रखडत ठेवून त्यानंतर डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्याचे सांगितले. पद्मावती सिनेमाची प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

 

First published: November 20, 2017, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading