Home /News /national /

भीषण विमान अपघातात पाकिस्तानातील बँकर सुखरुप, सर्व प्रवाशांच्या मृत्यूची व्यक्त केली होती भीती

भीषण विमान अपघातात पाकिस्तानातील बँकर सुखरुप, सर्व प्रवाशांच्या मृत्यूची व्यक्त केली होती भीती

पाकिस्तानातील भीषण अपघात झालेल्या या विमानात 107 जण प्रवास करीत होते

    इस्लामाबाद, 22 मे : पाकिस्तानातील (Pakistan ) कराचीमध्ये आज भीषण अपघात झाला. लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समधील फ्लाईट या रहिवासी भागात क्रॅश झाली. या विमानात 107 प्रवासी होते. सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार या विमानातील सर्व प्रवासी अपघातात मरण पावल्याची माहिती समोर आली होती. मात्र पाकिस्तानातल जियो न्यूजने दिलेल्या बातमीनुसार या अपघातात पाकिस्तानाही एक बँकर जिवंत आहे. हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. जियो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या अपघातात पंजाबचे चीफ एग्जीक्युटीव्ह ऑफिसर जफर मसूद बचावले आहेत. सांगितले जात आहे की त्यांना फार गंभीर जखम झालेली नाही. पाकिस्तान आतंरराष्ट्रीय हवाईसेवेचे विमान कराचीच्या जिन्न एअरपोर्टवर लँड करणार होते. लँडिंगपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाला. लँडिंग गिअरमध्ये समस्या निर्माण झाल्याने विमानाचा अपघात झाला. फ्लाईटमध्ये 98 प्रवासी होते. यामध्ये जफर मसूददेखील होते. विमानाचा अपघात झाल्यानंतर पाकिस्तानी बँकचे प्रेसिंडेंट जफर मसूद जखमी अवस्थेत होता. त्यांना कराचीच्या दारुल सेहत रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. ड़ॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची कॉलर बोर्न फ्रॅक्चर झाला आहे. याशिवाय त्यांच्या मांडीचं हाड तुटलं आहे. याबाबत जफर मसूद यांच्या आईशी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी बातचीत केली आहे आणि जफर सुखरुप असल्याची माहिती दिली. हे वाचा -रक्ताने माखलेल्या 5 महिन्यांच्या भ्रूणाला हातात घेऊन रडत होतं दाम्पत्य
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या