स्टेट बँकेकडून आधारदरात ०.३० टक्क्यांची कपात! ग्राहकांना मोठा फायदा

स्टेट बँकेकडून आधारदरात ०.३० टक्क्यांची कपात! ग्राहकांना मोठा फायदा

स्टेट बँकेनंही आधारदरात ०.३० टक्क्यांची कपात करून आपल्या ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे. गृहकर्जावरील किमान व्याजदर ८.९५ टक्क्यांवरून ८.६५ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

  • Share this:

02 जानेवारी : जगभरात नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या दुकानात आणि मॉल्समध्ये ऑफर्स दिल्या जातात. तसंच स्टेट बँकेनंही आधारदरात ०.३० टक्क्यांची कपात करून आपल्या ग्राहकांना नववर्षाची भेट दिली आहे. गृहकर्जावरील किमान व्याजदर ८.९५ टक्क्यांवरून ८.६५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. हे व्याजदर १ जानेवारीपासूनच लागू झालं आहे. या निर्णयाचा २०१६च्या पूर्वी गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. एका अंदाजानुसार ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील दरमहा हप्ता ५७५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

गृहकर्जावर असा होईल फायदा

जर ग्राहकाने ३० लाख रुपयांचे गृहकर्ज आधारदरानुसार २० वर्षांसाठी घेतले आहे, त्यांच्या व्याजदरात ०.३० टक्के घट होणार आहे. त्यामुळे त्यांचा दरमहा हप्ता ५७५ रुपयांनी घटणार आहे.

कर्ज रक्कम (रु) आधारदर (%) मुदत (वर्षे) मासिक हप्ता (रु)

३० लाख ८.९५ २० २६,८९५

३० लाख ८.६५ २० २६,३२०

(मासिक हप्त्यातील बचत - ५७५ रुपये)

वाहनकर्जावर असा होईल फायदा

जर ग्राहकाने ५ लाख रुपयांचे कर्ज कारसाठी आधारदरानुसार ५ वर्षांसाठी घेतले आहे, त्यांच्या व्याजदरात ०.३० टक्के घट होणार आहे. त्यामुळे त्यांचा दरमहा हप्ता ७३ रुपयांनी घटणार आहे.

कर्ज रक्कम (रु) आधारदर (%) मुदत (वर्षे) मासिक हप्ता(रु)

५ लाख ९.६५ ५ १०,५३७.६२

५ लाख ९.३५ ५ १०,४६४.३२

(मासिक हप्त्यातील बचत : ७३ रुपये)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 10:07 AM IST

ताज्या बातम्या