मराठी बातम्या /बातम्या /देश /

ISI च्या मदतीनं एक नवी दहशतवादी संघटना स्थापन; भारतातील 200 लोक 'हिट लिस्ट'मध्ये

ISI च्या मदतीनं एक नवी दहशतवादी संघटना स्थापन; भारतातील 200 लोक 'हिट लिस्ट'मध्ये

गुप्तचरांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे स्थानिक लोक खोऱ्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे स्थानिक लोक खोऱ्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे स्थानिक लोक खोऱ्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

    नवी दिल्ली 17 ऑक्टोबर : भारतीय गुप्तचर संस्थांना (Indian Intelligence Agencies) पाकिस्तान-स्थित गटांद्वारे एक नवीन तन्झीम (दहशतवादी संघटना) (Terrorist Organization) स्थापन करण्याबाबत सतर्क केले गेले आहे. ही संघटना येत्या काळात सुरक्षा दल, त्यांचे सहाय्यक, सरकारचे जवळचे पत्रकार, खोऱ्यातील स्थानिक नसलेले लोक, काश्मिरी पंडित, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि उद्योगपतींवर होणाऱ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारेल. गुप्तचर सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मिळालेल्या गुप्तचरानुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) समर्थित गटांनी 200 संस्था आणि त्यांच्या वाहनांबाबत हिट लिस्ट तयार केली आहे. मिळालेल्या माहितीतून समजतं की विविध संघटनांच्या प्रमुखांसह आयएसआयच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये झाली. PoK मध्ये गुप्त बैठक, 200 जणांच्या हत्येचा उद्देश अन् बरंच काही; पाकचा कट उघड टीओआयनं पाहिलेल्या एक गुप्त नोटमध्ये उल्लेख केला गेला आहे, की या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की ही नवीन आघाडीची संघटना केवळ भविष्यातील लक्ष्यित हत्याकांडाचा (Targeted Killings) दावा करणार नाही, तर संसाधने, मनुष्यबळ आणि नेटवर्कही अधिक वाढवेल. गेल्या वर्षी, आयएसआयने एलईटीसाठी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) नावाचा एक अग्रगण्य संघ तयार केला होता, जो आता काश्मीर खोऱ्यातील बहुतेक हल्ल्यांचा दावा करतो. आता असं समोर आलं आहे, की बर्फवृष्टीच्या काळातही दहशतवाद्यांकडून लक्ष्यित हत्या सुरूच राहतील. High Alert in Delhi: सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत अतिरेकी हल्ल्याचा धोका गुप्तचरांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे स्थानिक लोक खोऱ्यात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. असं मानलं जातं, की दहशतवादी गट अशा लोकांचा वापर करेल जे अजूनही सुरक्षा दलांच्या नजरेआड आहेत आणि तळागाळातील कार्यकर्ते म्हणून त्यांच्या हत्यांसाठी काम करतात. कारण यामुळे या हत्या एक सामान्य आणि पूर्णपणे स्वदेशी वाटू शकतात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या