जयपूर, 18 एप्रिल : कोरोनाच्या संकटात अनेक नात्यांमधील खोटेपणा समोर आला. अनेक जवळच्यांनी गरजेच्या वेळी पाठ फिरवली. मात्र असं असलं तरी अनेक ठिकाणी माणुसकीची ज्योत तेवत होती. धर्म, जात सोडून अनेकजण एकत्र आले व माणसासाठी धावून गेले. असाच प्रत्यय या घटनेतून मिळतो. राजस्थानमधील उदयपूर येथे अकील मन्सुरी या तरुणाने प्लाझ्मा दान करण्यासाठी रोजा सोडण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या या पुढाकारामुळे दोन महिलांचा जीव वाचला आहे. अकिल मन्सुरी या तरुणाने आतापर्यंत तब्बल 17 वेळा प्लाझ्मा दान केलं आहे. त्यामुळे अकिलचं शहरात मोठं कौतुक केलं जात आहे. 32 वर्षीय अकिल मन्सुरी हा उदयपूरच्या देबारी परिसरात राहतो. मध्यंतरी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यातुन तो सुखरुप बाहेर आला. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशांना वाचविण्यासाठी या आजारातून बऱ्या झालेल्यांनी प्लाझ्मा दान करावं, असं आवाहन केलं जात आहे. त्यामुळे उदयपूरमध्ये जेथे जेथे प्लाझ्माची गरज असते तेथे अकिल धावून जातो.
हे ही वाचा-आई म्हणजे आईच असते! पोटच्या तीन लेकरांसाठी 'ती' कोविड सेंटरमध्ये
सध्या रमजानचा महिला सुरू आहे. मुस्लिमांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या काळात मुस्लीम बांधव उपवास करतात. अकिलनेही रोजा धरला होता. त्यातच दोन महिलांना प्लाझ्माची गरज असल्याने अकिल तेथे पोहोचला. प्लाझ्मा दान करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला काही खाल्ल का? असं विचारलं. मात्र रोजा असल्यानं अकिलने काही खाल्लं नव्हतं. त्यांनंतर अकिलने कसलाही विचार न करता महिलांचा जीव वाचविण्यासाठी रोजा सोडला. अकिलने दान केल्यामुळे निर्मला आणि अलका या दोन्ही महिलांचा जीव वाचला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र आता त्या दोघीही सुखरुप आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.