DTH च्या छत्रीवर बसलेला माकड तुम्हाला 'महिंद्राची कार' जिंकवून देऊ शकतो; फक्त उद्यापर्यंत आहे संधी

DTH च्या छत्रीवर बसलेला माकड तुम्हाला 'महिंद्राची कार' जिंकवून देऊ शकतो; फक्त उद्यापर्यंत आहे संधी

ही कार मिळविण्यासाठी तुम्हाला डोकॅलिटी वापरावी लागणार आहे, त्यासाठी हे वाचा...

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा ट्विटरवर कायम सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटरमधून अनेक नवनव्या गोष्टी समोर आणत असतात. अनेकदा यामध्ये क्रिएटिव्ह गोष्टींचं ते कौतुक करतात. त्यांनी शेअर केलेल्या फोटो वा व्हिडीओपेक्षाही त्यांनी दिलेली कॅप्शन मजेशीर असते. ते बऱ्याचदा एक फोटो शेअर करतात आणि कॅप्शन कॉम्पीटीशन (caption competition) घडवून आणतात. यामध्ये ते एक हिंदी आणि इंग्रजी कॅप्शन देणाऱ्या विजेत्याची निवड करतात. मात्र ही बाब इथेच संपत नाही, तर यंदा विजेत्याला महिंद्राची स्केल मॉडल गाडीही मिळू शकते. यंदा आनंद महिंद्रांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये डीटीएचच्या छत्रीवर एक माकड बसला आहे. या फोटोवर त्यांनी वापरकर्त्यांकडून कॅप्शन मागितले आहे.

आनंद्र महिंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, - जिंकणाऱ्याला स्केल मॉडल गाडी मिळेल. स्केल मॉडल म्हणजे एक छोटी खेळण्यातली गाडी समजा. ही गाडी हुबेहुब खऱ्या गाडीप्रमाणे असते. केवळ खेळणं असतं नाही. म्हणजे या स्केल मॉडेलला अत्यंत बारकाईने तयार केलं जातं. खऱ्या गाडीची नक्कल केली जाते. याचा अर्थ कॅप्शनच्या विजेत्याला लाखोंची कार नाही तर केवळ स्केल मॉडल मिळेल. ज्याची किंमत काही हजारांमध्ये असेल. हा ही गाडी आनंद महिंद्रा देणार असल्याने याची लोकांमध्ये क्रेझ नक्कीच आहे.

याआधीही असे फोटो केले आहेत शेअर

आनंद महिंद्रा कायम असे क्रिएटीव्ह फोटो शेअर करीत असतात. लॉकडाऊनच्या काही दिवसांपूर्वी 15 मार्चला त्यांनी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एका ठेल्यावर घरासारखे चित्र तयार केले होते. असं वाटत होतं जणू कोणी सायकलवर घर उचललं आहे.

बसवर उलटी बस

गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एका बसवर उलटी बस होती. ही क्रिएटिव्हीटी पाहून आनंद महिंद्रा प्रभावी झाले आणि हा फोटो त्यांनी कॅप्शन कॉम्पिटीशनसाठी शेअर केला.

Published by: Meenal Gangurde
First published: October 10, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या