मराठी बातम्या /बातम्या /देश /

'कोरोना इज कमिंग', 7 वर्षांपूर्वीच्या व्हायरल ट्वीटने खळबळ

'कोरोना इज कमिंग', 7 वर्षांपूर्वीच्या व्हायरल ट्वीटने खळबळ

सोशल मीडियावर सध्या 7 वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये कोरोनाबाबत भाकित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर सध्या 7 वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये कोरोनाबाबत भाकित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर सध्या 7 वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये कोरोनाबाबत भाकित करण्यात आले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 16 मार्च : चीनच्या प्राणघातक कोरोनाव्हायरसने जगभरातील सर्व देशांमध्ये हैदोस घातला आहे. या विषाणूने आतापर्यंत 6 हजार 517 लोकांचा जीव घेतला आहे. तर 1 लाख 69 हजार 484 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूचे नाव तुम्ही गेल्या दोन-तीन महिन्यात ऐकले असेल मात्र, या विषाणूबाबत 7 वर्षांपूर्वीच भाकित करण्यात आले होते. एका व्हायरल ट्वीटमुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मार्को नावाच्या इसमाने 2013 मध्येच त्याला माहिती दिली. मार्कोचे हे ट्वीट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 3 जून 2013 रोजी, @Marco_Acortes नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आले होते. यात कोरोना व्हायरस येत आहे, असे लिहिण्यात आले होते. सात वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना विषाणूबद्दलच्या या भविष्यवाणीने लोक थक्क झाले आहे. वाचा-कोरोनाची दहशत: इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद वाचा-केरळनंतर राजस्थानातील 3 रुग्णही ठणठणीत झाले, 'कोरोना'वरील उपचाराचं जयपूर मॉडेल हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझरने यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने, या ट्वीटची तारीख बदलण्यात आली आहे, असे सांगितले. तर, काहींनी चीनवर टीका केली आहे. वाचा-आता संसारात शिरला कोरोना! व्हायरसमुळे 300 जोडप्यांनी केला घटस्फोटासाठी अर्ज भीतीदायक परिस्थिती वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार सध्या इटली, इराण आणि स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे. इराणमधील मृतांची संख्या वाढून 724 झाली आहे. तर दुसरीकडे स्पेनमध्ये एका दिवसात 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 14 झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सहा हजारहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 59 हजार 844 संसर्गित असल्याचे आढळले आहे. वाचा-Coronavirus ची जगभरातली खरी आणि ताजी माहिती एका क्लिकवर; Covid-19 ट्रॅकर लाँच 76 हजार रुग्ण झाले बरे कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी त्याचा मृत्यू दर कमी आहे. कोरोनाविषयी माहिती देणारी वेबसाइट वर्ल्डोमीटर डॉट कॉमने आतापर्यंत 1 लाख 60 हजार 564 लोकांना याची लागण झाली आहे. तर यातील 5 हजार 962 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपेक्षा या आजारातून निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जगातील 75 हजार 959 लोकं या आजाराला मात देऊन बरे झाले आहेत. तर अजूनही 78 हजार 643 लोकांवर उपचार सुरू आहेत. जर सकारात्मक दृष्टीने पाहिले तर सुमारे 72 हजार 989 लोकांना म्हणजेच जवळपास 93 टक्के लोकांना किरकोळ समस्या आहेत. तर, केवळ 5 हजार 654 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या