तो रंगवतो अवघ्या 30 सेकंदात भिंत, करामती व्यक्तीचा VIDEO VIRAL

तो रंगवतो अवघ्या 30 सेकंदात भिंत, करामती व्यक्तीचा VIDEO VIRAL

अवघ्या 30 सेकंदात एका व्यक्तीने भिंत रंगविल्याच्या एका व्हिडिओने नेटिझन्सला चकित केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: सोशल मीडियावर (Social  Media) जगभरातील विविध प्रकारचे व्हिडिओ, फोटो, माहिती व्हायरल होत असते. जगाच्या कानाकोपऱ्यातील एखादी गोष्ट, व्यक्ती अवघ्या काही वेळात जगातील लाखो हजारो लोकांपर्यंत पोहोचते. सध्या सोशल मीडियावर अवघ्या तीस सेकंदात संपूर्ण भिंत रंगवणाऱ्या (Painting Wall in 30 Seconds) व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टाईम्स नाऊ न्यूजनं ही माहिती दिली आहे.

हा कोणी व्यावसायिक पेंटर नाही, सध्याच्या कोरोना काळामुळे बाहेरच्या लोकांना बोलावण्याची जोखीम घेणं शक्य नसल्यानं अनेक जण स्वतःच सगळी कामं करत आहेत. अशा ‘डू इट युवर ओन’ (DIY) तत्वाचं पालन करणाऱ्या लोकांपैकी ही एक व्यक्ती आहे. त्याचं कौशल्य बघून अचंबित झालेल्या नेटकऱ्यांनी आपलं घर रंगवायला त्यानं यावं, अशी अपेक्षा व्यकत केली आहे.

कोरोना साथीमुळं(Corona  Pandemic) जवळपास गेले वर्षभर बहुतांश लोक घरीच आहेत. अनेकजण अद्यापही घरूनच काम करत आहेत. त्यामुळं घरी बसल्या बसल्या लोकांना आपलं घर छान सजवून घेण्याच्या कल्पना सुचत आहेत. ऑनलाइन काम करत असल्यानं मिटिंग्जमध्ये सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांना आपण काम करतो ती जागा दिसत असते. त्यामुळं ती जागा, घर छान दिसावं याबाबत जागरुकता वाढली आहे; पण सध्याच्या स्थितीत यासाठी व्यावसायिक लोकांना बोलावून पेटिंगचं काम करून घेण्याची कोणाची इच्छा नाही. तसंच हे काम करणं खूप वेळ घेणारं असल्यानं स्वतःच ते करणं प्रत्येकाला शक्यही नाही; पण या व्यक्तीनं त्याच्या घर रंगवण्याच्या कौशल्यानं सर्वानांच थक्क केलं आहे. त्यानं विद्युत वेगानं अवघ्या तीस सेकंदात एक भिंत रंगवली आहे. त्याच्या या अफलातून कौशल्याचं दर्शन घडविणारा एक व्हिडिओ टिकटॉकवर (TikTok) एका युजरनं शेअर केला असून, पृथ्वीवर हे शक्य आहे का, अशी कॅप्शन दिली आहे.

या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती पांढऱ्या रंगात भिजवलेला रोलर (Roller) एका खोलीच्या पिवळा रंग दिलेल्या भिंतीवर झिगझॅग स्टाईलमध्ये फिरवत एका टोकापासून दुसऱ्या टोकाला येतो. त्यानंतर वरून-खाली अशा दिशेनं रोलर फिरवत अवघ्या 30 सेकंदात अख्खी भिंत रंगवून पूर्ण करताना दिसत आहे. अक्षरशः मॅगी शिजायच्या आत भिंत रंगवून होते. ही किमया करणाऱ्या या व्यक्तीला आपल्या घरी पेंटिंग करण्यासाठी बोलावण्यास लोक उत्सुक असून, अनेकांनी त्याला ऑफर दिली आहे.

हे देखील वाचा - VIDEO : चेन्नईच्या जोडप्यानं केलं 60 फुट खोल समुद्रात लग्न, कारण समजल्यावर वाटेल अभिमान!

एका युजरनं माझ्या घराचा हॉल, जिना आदी रंगवण्यासाठी याल का ? मी तासाची मजुरी देईन, असं म्हटलं आहे. एका महिलेनं अशाप्रकारे घर रंगवण्याचं काम सहजपणे कसं करता येईल, हे सांगत आपला पती अशाप्रकारेच रोलर रंगात बुडवून वेगानं भिंतीवर फिरवून रंगकाम करत असल्याचं म्हटलं आहे. कोरोना काळात घरी बसून काम करत असलेले किंवा मोकळा वेळ मिळालेले लोक पाककलेसाराख्या अनेक कौशल्यांमध्ये पारंगत झाले आहेत. असे एखादे कौशल्य तुम्हाला जगप्रसिद्धही बनवू शकते.

https://www.timesnownews.com/the-buzz/article/man-paints-an-entire-wall-in-just-30-seconds-netizens-want-to-hire-him-watch/714828

 

 

Published by: Aditya Thube
First published: February 3, 2021, 7:34 AM IST

ताज्या बातम्या