CAA विरोधातील लढ्याचं केंद्र झालेल्या 'शाहीन बाग'मध्येही गोळीबार

CAA विरोधातील लढ्याचं केंद्र झालेल्या 'शाहीन बाग'मध्येही गोळीबार

CAA आणि NRC या कायद्याला विरोधाचं केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : जामिया विद्यापीठानंतर आता शाहीन बागमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. CAA आणि NRC या कायद्याला विरोधाचं केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच जामीया विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच शाहीन बागमध्येही असाच प्रकार झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जामीया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला होता.

जामीयामध्ये गोळीबार करणाऱ्या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली. या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने सुरु असताना हा तरुणमध्ये घुसला होता. त्यानंतर त्याने आपल्या जवळच्या पिस्तुलाने गोळी झाडत काही घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण हवेत पिस्तुल दाखवत घोषणाबाजी करत असतानाही पोलिसांनी त्याला रोखलं नाही असा अशी टीका होत आहे.

First published: February 1, 2020, 5:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या