'क्रेडिट कार्ड'मुळे आत्महत्या, बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हे कर्ज फेडण्यासाठी त्याने कुटुंबीयांकडे आणि मित्रांकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याला कुणीही मदत केली नाही त्यामुळे आयुष्यच संपविण्याचा निर्णय त्याने घेतला.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 04:29 PM IST

'क्रेडिट कार्ड'मुळे आत्महत्या, बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का

नवी दिल्ली 26 जुलै : 'क्रेडिट कार्ड' घेण्यासाठी बँकेचे लोक सगळ्यांनाच फोन करून भंडावून सोडतात. ही गोष्ट आता काही नवीन राहिलेले नाही. 'क्रेडिट कार्ड'मुळे पैश्यांसाठी एक महिन्याची मुदत मिळत असली तरी त्यामुळे अनावश्यक खर्च होतो ही वस्तुस्थिती आहे. 'क्रेडिट कार्ड'च्या क्रेडीटच्या मोहाला बळी पडून कर्ज झालेल्या एका तरुणाने आपल्या कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. यात तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची बायको आणि लहान मुलगी गंभीर जखमी आहे.

बहिणीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या भावाने झोडपलं, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दिल्लीत नोकरी करणाऱ्या एका तरुणाने काही बँकांची क्रेडीट कार्ड्स घेतले होते. त्याच्या माध्यमातून तो भरमसाठ खरेदी करत असे. एकदा 'क्रेडिट कार्ड'ची सवय लागल्याने त्याच्या उधळपट्टीत वाढ झाली आणि त्याचा खर्चही वाढला. हळुहळू त्याच्या डोक्यावर 8 लाखांचं कर्ज झालं. नंतर ते कर्ज फेडणं शक्य झालं नसल्याने बँकेने त्याच्या मागे तगादा लावला.

बँकेचे अधिकारी प्रत्यक्ष घरी येऊन, फोन करून आणि मेसेजेस पाठवून त्याच्याकडे पैशाची मागणी करू लागले. सततच्या तगाद्यामुळे तो तरुण त्रासून गेला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने कुटुंबीयांकडे आणि मित्रांकडे पैशाची मागणी केली. मात्र त्याला कुणीही मदत केली नाही. त्यामुळे पैसे फेडायचे कसे असा प्रश्न त्याला सतावू लागला.

VIDEO: लोकसभेत नवनीत राणा भडकल्या, आझम खान यांच्या वक्तव्यावरून गोंधळ

Loading...

पैसे फेडणं शक्य होत नसल्याने त्याला नैराश्याने ग्रासलं. सततच्या तगाद्यामुळे मानहानी पत्करत जगण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असं त्याने पत्नीला सांगितलं आणि तिलाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. त्यांना असेलेल्या एका लहानग्या मुलीला घेऊन हे कुटुंब ते राहत असलेल्या चौथ्या मजल्याच्या टेरेसवर आलं आणि त्यांनी खाली उड्या घेतल्या. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी पार्किंगमध्ये असलेल्या एका स्कुटरच्या कुशनवर पडल्याने वाचली. तर पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...