• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दोरी समजून दिला नागावर पाय, 6 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

दोरी समजून दिला नागावर पाय, 6 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

अंगणात खेळणाऱ्या लहान मुलाने (little boy) दोरी (rope) समजून नागावर (Snake) पाय दिल्याने झालेल्या दंशात (Snake bite) या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 ऑगस्ट : अंगणात खेळणाऱ्या लहान मुलाने (little boy) दोरी (rope) समजून नागावर (Snake) पाय दिल्याने झालेल्या दंशात (Snake bite) या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. अंगणात खेळत असलेल्या 6 वर्षांच्या मुलाने नाग पाहिला. ती दोरीच आहे, असे समजून त्यावर पाय दिला. नागाने त्याला जोरदार दंश केला. त्यामुळे जोराने ओरडत जमिनीवर कोसळलेल्या मुलाकडे आईचे लक्ष गेले आणि तिने नातेवाईकांना बोलावत मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले. अशी घडली दुर्घटना राजस्थानमधील भितरवारमध्ये संदीप सिंग रावत यांचं कुटुंब राहतं. त्यांचा 6 वर्षांचा एकुलता एक मुलगा नील रावत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. नील घरासमोरच्या अंगणात खेळत होता. समोरच त्याची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. घर आणि अंगण याच्यामध्ये एक गॅलरी आहे. मुलाला नाग डसल्याचं कळताच आईने धावपळ करत नातेवाईकांच्या मदतीने नीलला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नीलवर उपचार होऊ शकले नाहीत. नागाच्या विषबाधेमुळे हळूहळू त्याचं शरीर निळं पडत गेलं. शहरातील जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये त्याचे आईवडिल त्याला घेऊन गेले, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर हतबल होऊन त्यांनी बाबा हकीमही बोलावले. मात्र त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा जीव काही वाचू शकला नाही, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’ने दिली आहे. हे वाचा -कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज कुटुंबावर शोककळा अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर रावत कुटुंबीयांना मूल झालं होतं. नील हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पण या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे अश्रू थांबत नसून गावातील प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करत आहे.
  Published by:desk news
  First published: