.... तर पीएनबीचा घोटाळा 2016 सालीच उघडकीस आला असता!

....  तर पीएनबीचा घोटाळा 2016 सालीच उघडकीस आला असता!

हरिप्रसाद नामक इसमाने 29 जुलै 2016ला पीएमओला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात पीएनबीमध्ये काहीतरी आर्थिक फेरफार होत असल्याचा आणि बॅलेन्स शीटमध्ये सगळं आलबेल नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • Share this:

16 फेब्रुवारी:  गेल्या दोन दिवसात संपूर्ण बॅंकिंग सेक्टरमध्ये प्रचंड खळबळ माजवणारा पीएनबीचा घोटाळा दोन वर्षांपूर्वाीच उघडकीस आला असता जर पंतप्रधानांनी एका पत्राची दखल घेतली असती. हरिप्रसाद नामक इसमाने   या घोटाळ्यासंदर्भात पत्र पीएमओला लिहिलं होतं.

हरिप्रसाद नामक इसमाने 29 जुलै 2016ला पीएमओला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात  पीएनबीमध्ये काहीतरी आर्थिक फेरफार होत असल्याचा आणि बॅलेन्स शीटमध्ये सगळं आलबेल नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय यात पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणीही करण्यात आली आहे. हे पत्र लिहिणारा हरी प्रसाद बेंगळुरूचा नागरिक आहे. त्याच्याकडे गीतांजली या कंपनीची एक शाखाही होती. त्याने या पत्रात 1000कोटींचा घोटाळा होत असून हे विजय माल्यासारखंच प्रकरण आहे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. या पत्राचंं उत्तरही आलं पण त्या पत्रात ही केस  क्लोज केल्याचा उल्लेख होता.

त्यामुळे सरकारने या पत्राकडे दुर्लक्ष का केलं हा विचार करण्याचा मुद्दा आहे. तसंच आता तरी नीरव मोदी आणि मेहुल चॉक्सीवर कारवाई होते  का  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 05:35 PM IST

ताज्या बातम्या