किन्नौर, 11 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) किन्नौर (Kinnaur) येथे पुन्हा एकदा दरड कोसळून (landslide) मोठी दुर्घटना घडली आहे. किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर ही दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून थेट एचआरटीसी बसवर आली यामुळे ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. किन्नौर जिल्ह्यातील मुरंग-हरिद्वार मार्गावर ही बस चालते. या मार्गावरुन जाणाऱ्या अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, सैन्य दलाचे जवान घटनास्थळी मदत आणि बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या वेगाने बचावकार्य सुरू कऱण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत फोनवरुन घटनेची माहिती घेत सर्व योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
#HimachalPradesh के #kinnaur में फिर टूटा पहाड़
NH निगुलसरी के पहाड़ी गिरने से सवारी से भरी बस और ट्रक की दब गए गई कुछ छोटे वाहन भी फंसे होने की भी आशंका बस में कितने लोग है जनकारी नहीं प्रशासन मौके की रवाना pic.twitter.com/UjOSUsIDm8 — PANDEY ISHTKAM 🕉️🇮🇳 (@IshtkamPandey) August 11, 2021
VIDEO: 'बैलगाडा शर्यतीला परवानगी द्या' म्हणत शेकडो बैलगाड्यांसह मोर्चा
दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्याची माहिती सर्वप्रथम बसच्या चालकाने दिली. या बसमध्ये जवळपास 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. किन्नौर येथील भावानगर जवळ ही दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बस दिसेनाशीच झाली आहे. अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 80 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
25 जुलै रोजी सुद्धा घडली होती दुर्घटना
गेल्या महिन्यात म्हणजेच 25 जुलै रोजी सुद्धा किन्नौर येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सांगला-छितकूल मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांनी आपले प्राण गमावले होते. तर तीन जण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस कोसळत आहे आणि त्याच दरम्यान अशा दुर्घटना घडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.