पाकिस्तानची मुजोरी; सीमेवरच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

पाकिस्तानची मुजोरी; सीमेवरच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

काश्मीरातलं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जातंय.

  • Share this:

नवी दिल्ली 20 ऑगस्ट : सीमेवर पाकिस्तानची मुजोरी सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून भारतानेही त्याला चोख उत्तर दिलंय. आज पाकिस्तानच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला. तर चार जण जखमी झालेत. केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबारासह तोफांचाही मारा केलाय. सीमावर शांतता असावी असं प्रयत्न वारंवार केला जातो. मात्र लक्ष वेधण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना घुसखोरी करताना मदत व्हावी म्हणून पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार असा प्रकार केला जातो.

सकाळी 11 वाजतापासून पाकिस्तानने हा गोळीबार सुरू केला. तोफा आणि गोळ्यांचा मारा होत असल्याने भारतीय जवानांनीही त्याला चोख उत्तर दिलं. पुंछमधल्या कृष्णा घाटीतल्या मेंढरमधल्या बलनोई आणि मनकोट या भागातही पाकिस्तानने तोफगोळ्यांचा जोरदार मारा केला. काश्मीरातलं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन केलं जातंय.

सीमेवरच्या भागांमध्ये जेव्हा दोन्ही बाजूंकडून गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा होतो त्यावेळी सीमा भागात राहणारे नागरिक भरडले जातात.

अध्यक्ष ट्रम्प  आणि पंतप्रधान खान यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारी (19 ऑगस्ट)रात्री फोनवरून चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबतही संपर्क साधला. स्वतः ट्रम्प यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली. या दोन्ही देशांना जम्मू-काश्मीरमधील तणाव कमी करण्याचा सल्ला दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यापासून इमरान खान यांच्यासोबत संवाद साधण्याटी ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट

'माझे दोन चांगले मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत मी बातचित केली. या दोन्ही देशांना काश्मीरमधील तणाव कमी करण्याचा सल्ला दिला. सध्याची परिस्थिती कठीण आहे. पण दोन्ही नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली'.

ट्रम्प -मोदी फोन पे चर्चा

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यावरून भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)यांनी डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यासोबत 'फोन पे चर्चा' केली. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. मोदींनी पााकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताविरोधात केलेल्या विधानांचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताविरोधात हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणीखोर भाषणं देणं योग्य नाही. यामुळे क्षेत्रीय शांततेला नुकसान पोहोचत आहे.   पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बल अर्धा तास चर्चा झाली. द्विपक्षीय आणि क्षेत्रीय शांततेच्या प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चेदरम्यान ओसाका (Osaka) येथील जी-20 शिखर (G-20 Summit)  संमेलनाचा देखील उल्लेख केला.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 20, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading