मराठी बातम्या /बातम्या /देश /'भानुमती'चीही चालली नाही जादू; हिंसक हत्तीला पकडण्यासाठीचा हनी ट्रॅप ठरला अयशस्वी

'भानुमती'चीही चालली नाही जादू; हिंसक हत्तीला पकडण्यासाठीचा हनी ट्रॅप ठरला अयशस्वी

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

हा हत्ती नर हत्तींना दाद देत नसल्यामुळे वन विभागाला (The Forest Department) टस्कर हत्तीण वापरण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी या सर्व प्रकरणात भानुमतीची (Bhanumati) मदत घ्यायचं ठरवलं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Lanja, India

  नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : ‘हनी ट्रॅप’ हा अत्यंत धोकादायक आणि फौजदारी गुन्हा मानला जातो. परंतु कर्नाटकमध्ये हिंसक हत्तीला पकडण्यासाठी वन विभागाकडून शेवटचा उपाय म्हणून ‘हनी ट्रॅप’चा वापर केला जात आहे. मात्र, ‘हनी ट्रॅप’ वापरूनही हा हत्ती वन विभागाच्या ताब्यात येणंही कठीण दिसतंय. टस्कर हत्ती शेतमालाचं नुकसान करत असल्याने त्याला पकडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वन विभागावर दबाव आणला जातोय. पण त्याला पकडण्यात अधिकाऱ्यांना अपयश येतंय. या संदर्भात बेंगळुरू मिररनं वृत्त दिलंय.

  टस्कर हत्तीला पकडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी त्याला आमिष देण्यासाठी इतर मोहिमांमध्ये पकडलेल्या हत्तींचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ‘हावेरी वाईल्ड टस्कर’ (Haveri wild tusker) ऑपरेशन राबवण्यात येतंय. या ऑपरेशनसाठी शिवमोग्गा (Shivamogga ) येथून बबन्ना (Babanna), सोमन्ना (Somanna) आणि बहादूर (Bahadur) नावाचे ‘तज्ज्ञ’ हत्ती आणण्यात आले. त्यांच्यासह 11 माहूत, वन निरीक्षक आणि अधिकाऱ्यांसह 30 जणांच्या प्रयत्नांनंतरही हे ऑपरेशन अयशस्वी झालं.

  दरम्यान, हा हत्ती नर हत्तींना दाद देत नसल्यामुळे वन विभागाला (The Forest Department) टस्कर हत्तीण वापरण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी या सर्व प्रकरणात भानुमतीची (Bhanumati) मदत घ्यायचं ठरवलं. भानुमती ही हत्तीण आपल्या प्रेमाच्या जाळ्यात या हिंसक हत्तीला अडकवले आणि वन विभागाचे अधिकारी त्याला पकडतील अशी मूळ कल्पना होती. यालाच ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. अनेकदा कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी पोलीस ‘हनी ट्रॅप’चा वापर करतात. पण गेल्या दोन दिवसांत भानुमतीने प्रेमाचं जाळं वाटावं अशा अनेक युक्त्या करूनही हा हत्ती जाळ्यात अडकत नाहीये.

  हे वाचा - सावरकर विरुद्ध टिपू सुलतान वाद योगायोग की आणखी काही? 'या' घटनांमुळे संशय वाढला

  हत्ती रात्रीच्या वेळी शेतमालांचं नुकसान करायचा आणि नंतर वाचण्यासाठी जवळच्या टेकडीवर आणि इतर ठिकाणी पळून जात होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, आता ‘हनी ट्रॅप’चा प्रयत्नही फसल्यामुळे वन अधिकारीही हैराण झाले आहेत. हा प्रयत्न अयशस्वी होण्याचं कारण म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारची युक्ती या बदमाश हत्तीला पकडण्यासाठी वापरली गेली होती, असं एका वन अधिकाऱ्याने बेंगळुरू मिररला सांगितलं.

  हे वाचा -  'काँग्रेसने साथ द्यायला हवी होती पण...' नाराज शरद पवारांनी थेट सुनावलं

  “सात महिन्यांपूर्वी एका बदमाश टस्कर हत्तीने हावेरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. त्या हत्तीला ‘हनी ट्रॅप’ रचून भानुमतीच्या मदतीने पकडण्यात आलं होतं. नंतर त्या टस्करला रेडिओ कॉलर लावली गेली आणि चिकमंगळुरू (Chikkamagaluru ) येथील तनिगेबैलू (Tanigebailu ) जंगलात त्याचे पुनर्वसन करण्यात आलं. तिथे हेब्बे आणि मुत्तोडीच्या जंगलात फिरत असलेला हत्ती जवळच्या शेतांमध्ये जाऊ लागला आणि शेतमालाचं नुकसान करू लागला,” असं अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, याआधी भानुमतीमुळे पकडला गेल्याने हा हत्ती आता तिला टाळत असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

  First published:
  top videos

   Tags: Elephant