Home /News /national /

'UP निवडणुकांआधी होणार बड्या हिंदू नेत्याची हत्या'; राकेश टिकेत यांचं वादग्रस्त विधान

'UP निवडणुकांआधी होणार बड्या हिंदू नेत्याची हत्या'; राकेश टिकेत यांचं वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधान करत राकेश टिकेत म्हणाले, की उत्तर प्रदेश निवडणुंआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू लिडरची हत्या (Murder of Hindu Leader) होऊ शकते.

    नवी दिल्ली 01 सप्टेंबर  : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात (3 Farm Laws) अनेक महिन्यांपासून आंदोलन करत असलेले शेतकरी नेते राकेश टिकेत (Rakesh Tikait) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सिरसामध्ये बोलताना टिकेत म्हणाले, की भाजपपेक्षा घातक कोणताच पक्ष नाही. यासोबत वादग्रस्त विधान करत त्यांनी म्हटलं, की उत्तर प्रदेश निवडणुंआधी (Uttar Pradesh Election) एखाद्या मोठ्या हिंदू लिडरची हत्या (Murder of Hindu Leader) होऊ शकते. हरियाणाच्या सिरसामध्ये शेतकरी संमेलनाला पोहोचलेले भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकेत यांनी भाजप सरकारवर मोठा आरोप केला. टिकेत म्हणाले, की यूपी निवडणुकांच्या आधी एखाद्या मोठ्या हिंदू लिडरची हत्या होणार आहे. ते म्हणाले, की यांच्यापासून सावधान राहा आणि हे एका मोठ्या हिंदू लिडरची हत्या करून देशात हिंदू-मुसलमान या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. कतारमध्ये भारताची तालिबानसोबत औपचारिक चर्चा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे राकेश टिकेत म्हणाले, की भाजपपेक्षा धोकादायक इतर कोणता पक्ष नाही. ज्या लोकांनी भाजपची निर्मिती केली, आज त्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे. टिकेत म्हणाले, की या देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. त्यांनी असा आरोप केला, की ज्या SDM नं शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू. फक्त भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला, पंतप्रधान मोदींचा सल्ला राकेश टिकेत म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं, की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. मात्र, असं झालं नाही आणि शेतमालालाही दुप्पट भाव मिळाला नाही. यासोबतच टिकेत म्हणाले, की देशातील मोठ्या कंपन्या कर्ज घेऊन ते माफ करून घेतात आणि नंतर याच कंपन्या सरकारी संस्थान खरेदी करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज घेऊन ते भरू शकला नाही तर त्याचं घर आणि जमिनही लिलावासाठी काढली जाते. कर्ज 10 लाखाचं असलं तरीही शेतकऱ्याची 50 लाखाची जमीन विकली जाते. हा कसला कायदा आहे, असा सवालही त्यांनी केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Farmer protest, Hindu, Uttar pradesh news

    पुढील बातम्या